
Avinash Abhyankar On Uddhav Thackeray : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) रिफायनरी प्रकल्पांच्या संदर्भात बारसू (Barsu Refinery) येथील जमिनीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. स्थानिकांना या प्रकल्पाला केलेल्या या विरोधानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले आहे. यावरूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवार झाली आहे. मात्र या प्रकल्पाच्या जागेच्या निवडीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पत्र व्हायरल होत आहे.
याच वादात आता महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने (MNS) उडी घेतली आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांच्या पत्रावरून आता महाविकास आघाडीला प्रश्न विचारण्यात येत आहेत. मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले आहे.
"12 जानेवारी २०२२ रोजी महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील जमीन ही रिफायनरी प्रकल्पाकरीता वापरण्यायोग्य आहे, व या प्रस्तावाचा विचार करावा, अशा आशयाचे पत्र लिहले होते. तेव्हा वैचारिक बेरोजगार, कर्तव्यशून्य खासदार हे कुठल्या सुपारिच्या बागेत सहलीला गेले होते. कोकणवासीयांशी खेळणं बंद करा, असे मनसेचे अभ्यंकर म्हणाले आहेत?
काय आहे पत्र ?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे पत्रावर सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. ज्यावेळी स्वत: उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाच्या स्थळनिश्चितीवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहले होते, त्यावेळी त्यांनी बारसूच्या स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले होते का? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.