MNS News : अडीच वर्षे जे राजकारण सुरु आहे, ही चांगली गोष्ट नाही बरं का .. ; असं मनसेनं का म्हटलं ?

MNS Gudhipadwa Melava rally teaser launch Raj Thackeray : चाळीस सेकंदाचं टीझर मनसे आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केले आहे.
MNS  Raj Thackeray
MNS Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MNS Gudhipadwa Melava rally teaser launch Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षावर त्यांना विचारण्यात येणाऱ्या विविध प्रश्नांना टाळत राज ठाकरेंनी सूचकपणे इशारा दिला होता.

काल (शनिवारी) मनसे एकापाठोपाठ दोन टीझर लॉन्च केले आहेत. मनसेच्या दुसऱ्या टीझरमध्ये विधानभवनाच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या आवाजात एक ऑडिओ सुरु आहे. या ऑडितील शब्द अक्षरात दिसतात.

त्यात म्हटलं की, गेले दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ना ही चांगली गोष्ट नाही बरं का…महाराष्ट्रासाठी! असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं. हेच खरं राजकारणं आहे ,असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे राजकारण नव्हे! त्यानंतर पुढे राज ठाकरेंच्या फोटोसह ‘महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज…’ असल्याचं शीर्षक दिसतं. पुढे ‘चला शीवतीर्थावर!’ असं आवाहनही मनसेने या टीझरच्या माध्यमातून दिले आहे. चाळीस सेकंदाचं टीझर मनसे आपल्या अधिकृत ट्विटरवर शेअर केले आहे.

MNS  Raj Thackeray
karnataka Congress : काँग्रेस उमेदवाराची पहिली यादी बुधवारी जाहीर होणार ; ६१ विद्यमान आमदारांना..

"सध्याच्या राजकीय विषयावर बोलून मी तुम्हाला कुठलाही प्रोमो, टीझर देणार नाही, गुढीपाडव्याला सिनेमा दाखवणार," असे सांगत राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी विरोधकांना इशाराच दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे गुढीपाडव्याला कुठला 'सिनेमा'दाखवणार हे आपल्यासा गुढीपाडव्यालाच समजेल.

“महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी चला शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा, २२ मार्च २०२३ सायं. ६ वा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई”, असे शेअर करण्यात आलेल्या टीझरला कॅप्शन देण्यात आले आहे.

MNS  Raj Thackeray
Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंची तुलना अफजल खानसोबत ; रामदास कदमांचा हल्लाबोल ; ठाकरे गट आक्रमक

भोंग्याचा विषय गेल्यावर्षी पाडवा मेळाव्यातून गाजला होता. त्यामुळे यंदा कोणत्या मुद्द्यावरून ते राज्याच्या जनतेला संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मेळाव्याचा टीजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समाज माध्यमावर शेअर केला आहे.

आगामी निवडणुका, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, पोटनिवडणुका, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील निकाल या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com