Raj Thackeray : सोशल मीडियावर गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना दम

MNS News : 'माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर बोलाल तर हकालपट्टी अटळ...'
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray News : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्याच पक्षात असणाऱ्या गटबाजीवर संतापले आहेत. याबाबत त्यांनी पक्षांतील पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत दमच भरला आहे. माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावर बोलाल तर हकालपट्टी अटळ आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

तर मनसे नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी आपली नाराजी सोशल मीडिया आणि माध्यमांमधून व्यक्त केली होती. त्या बरोबरच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एका कार्यकर्त्याला पद देण्याची मागणी देखील केली होती. तर आता याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी पत्रक काढत पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत थेट हकालपट्टी अटळ असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं?

''सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येते. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्सने हे सगळे शेफारले आहेत''.

''इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही. माझ्या पक्षातल्या कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला.''

''पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केले तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या,'' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray
Pune MNS : राज ठाकरेंच्या तंबीनंतर वसंत मोरेंची बोलती बंद

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) हे पक्षांतर्गत गटबाजीवर प्रचंड संतापले असून त्यांनी पत्राच्या माध्यमातून पक्षांतील पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत दमच भरला आहे. तर आता राज ठाकरेंच्या या तंबीमुळे मनसेतील अंतर्गत गटबाजीला आळा बसणार का? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com