MNS News : मनसे नेते संदीप देशपाडे (Sandeep Deshpade) यांच्यावर काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हल्ला झाला होता. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हल्लेखोरांना इशारा दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज १७ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी संदीप देशापांडे यांना स्टेजवर बोलवत हल्लेखोरांना इशारा दिला. राज ठाकरे म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला अनेकांनी विचारले. तुम्हाला काय वाटते, कुणी हल्ला केला असेल. त्यावेळी मी बोललो नाही. मात्र, एक निश्चित सांगतो. हे ज्यांनी केले त्यांना आधी कळेल, आणि नंतर इतरांना कळेल. माझ्या मुलांचे असे रक्त मी वाया जाऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिली.
पुढे राज ठाकरे म्हणाले, पक्ष सोडून गेले ते एक-एकटे गेले. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र, त्यांना मत का पाडत नाहीत. मग जे १३ आमदार निवडणून आले होते ते काय सोरडवरती आले होते का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काही पत्रकार अनेक पक्षांना बांधलेले आहेत. ते जाणून बूजून असा प्रचार करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट मला काय विचारता, इतकी वर्ष देशावर राज्य केलेल्या त्या काँग्रेसचे काय झाले ते पहा. भरती नंतर ओहटी आणि ओहटी नंतर भरती येते, भाजपने ही लक्षात ठेवले पाहिजे, आज भरती चालू आहे. ओहटीही येवू शकते, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.
या सगळ्या कालखंडामध्ये पुढे जात असताना, आमचा राजू पाटील, पक्षाची बाजू आज विधानसभेत एकटा मांडतो आहे. एकही है लेकिन काफी है. ती विधानसभा भरून गेली तर काय होईल. मनसेच्या विरोधात प्रचार करा असे कोणीतरी यांना सांगते. संभ्रम निर्माण केला जातो, गर्दी जमते पण मत जातात कुठे. आम्ही आंदोलने अर्धवट सोडली, म्हणतात एकतरी आंदोलन दाखवा. भाजप आणि शिवसेनेने त्यांच्या जाहिरनाम्यात टोल मुक्तीची घोषणा केली होती. त्याचे पुढे काय झाले. आणि तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात, असेही राज ठाकरे म्हणाले.
१७ वर्षात काय केले याच्या महत्त्वाच्या गोष्टींचे पहिले डिजिटल पुस्तक मनसेच्या वतीने प्रकाशीत करण्यात आले आहे. मनसे येवढी आंदोलने कोणीच केली नाही. या वेळी १७ वर्षातील कामांचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये मनसेची सगळी आंदोलन आणि विषय सांगितले. नाशिमध्ये काय केले याचा आढावा घेतला. नाशिकमध्ये येवढे काम केले. मात्र, लोकांना काय होते ते कळत नाही, अशी खंतही यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.