शिवाजी पार्कमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना 'सामना' सुरु

शिवाजी पार्कचे (Shivaji Park) नुतनीकरण सुरू असताना मैदानाच्या मधोमध खडी टाकून त्यावर माती टाकण्याला मनसेने विरोध केला होता.
Sandeep Deshpande, Kishori Pednekar
Sandeep Deshpande, Kishori Pednekarsarkarnama

मुंबई : सध्या शिवाजी पार्क (Shivaji Park)मैदानाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र यामध्ये खडीचा वापर होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिवाजी पार्कमधील रस्त्यावरुन मनसे विरुद्ध शिवसेना (Shivsena) संघर्ष सुरु झाला आहे. मनसेच्या (mns)वतीने महापालिकेच्याविरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.

कामसाठी खडीचा वापर करण्यास मनसेकडून विरोध करण्यात आला होता. आता याचविरोधात मनसेने शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू केले आहे. मनसेच्या या आंदोलनाला स्थानिकांनी देखील पाठिंबा दिला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला स्थानिकांनी देखील पाठिंबा दिला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या ठिकाणी दौरा केला असता या ठिकाणी सिमेंटचा रस्ता असणार नाही अशी ग्वाही दिली होती मात्र शिवाजी पार्कचे (Shivaji Park) नुतनीकरण सुरू असताना मैदानाच्या मधोमध खडी टाकून त्यावर माती टाकण्याला मनसेने विरोध केला होता. यासाठी मनसेसैनिकांनी, नेत्यांनी या ठिकाणी मंगळवारी रात्रभर ठिय्या मांडला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत पालिका प्रशासनाने बैठक घेतली होती. त्यावेळी खडी ऐवजी ब्रिक्सचा वापर करणार असल्याचे कबूल केल्यानंतर मध्यरात्री पालिकेने खडी टाकून त्यावर कपडे अंथरून झाकण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच मनसे आणि स्थानिक नागरिकांनी काम थांबवत आंदोलन सुरू केलं आहे.

Sandeep Deshpande, Kishori Pednekar
'कमळीबाई' म्हटल्यावरुन मनसे कार्यकर्त्यांला आमदार महालेंच्या भावाकडून मारहाण

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, दिग्गजांच्या सभांनी गाजलेल्या आणि दादरकरांचा मानबिंदू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाचा लवकरच कायापालट होणार आहे. मैदानात उडणाऱ्या धुळीमुळे होणाऱ्या त्रासातून रहिवाशांची सुटका करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वर्षा जल संचयन प्रकल्प (Rain Water harvesting Project) हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असला, तरी मैदानात बांधण्यात येत असलेल्या मातीच्या रस्त्यावरून नवा वाद उभा राहिला आहे. त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे शिवाजी पार्कच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची नवी ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com