Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : टोमणे सम्राट ते रडू सम्राट; उद्धव ठाकरेंना मनसेचा खोचक टोला

Lok Sabha Election 2024 : मुंबईत मतदान केंद्रावरील गैरसोयींबाबत ठाकरेंनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले. तसेच मुंबईतील सर्व मतदान केंद्रावर संथ गतीने सुरू असलेल्या मतदानावर भाजपला जबाबदार धरले.
Uddhav Thackeray, MNS
Uddhav Thackeray, MNSSarkarnama

Maharashtra Political News : राज्यातील लोकसभा मतदारसंघातील पाचही टप्पे सोमवारी (ता. 20) पार पडले. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी Raj Thackeray महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊन ट्विस्ट निर्माण केला. या संपूर्ण लढतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी नेत्यांना टोले मारून घायाळ केले. पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान झाल्यानंतर ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगासह भाजपवर निशाणा साधला. यावर मनसेच्या वतीने ठाकरे शैलीतच टोले लगावले आहेत.

मुंबईत मतदान केंद्रावरील गैरसोयींबाबत ठाकरेंनी Uddhav Thackeray निवडणूक आयोगाला जबाबदार धरले. तसेच मुंबईतील सर्व मतदान केंद्रावर संथ गतीने सुरू असलेल्या मतदानावर भाजपला जबाबदार धरले. यासह निवडणूक आयोगाला भाजपचा घरगडी म्हणून संबोधले. मतदान केंद्रावरील उडालेल्या गोंधळास संपूर्णपणे आयोग जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर मनसेने ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.

लोकसभा निवडणूक Lok Sabha Election लागली त्यावेळी टोमणे सम्राट म्हणून सुरू झालेला आज रडू सम्राट कडे येवून थांबला आहे. चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसतो आहे, असा निशाणा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट केला आहे. मनसेच्या या बोचऱ्या टीकेमुळे ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता ठाकरे गटाकडून मनसेला काय उत्तर मिळते, याकडे लक्ष आहे.

Uddhav Thackeray, MNS
Nashik Constituency : नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत ; सिन्नरमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद!

दरम्यान, ठाकरेंनी मशालवर लढणाऱ्या उमेवादाराच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक संथगतीने मतदाना केले जात असल्याचा आरोप केला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या उन्हात लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आत गेल्यानंतर मतदान करायलाही जास्त वेळ लागत होता. हे प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत, असा आरोप ठाकरेंनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केला. तसेच मतदान केंद्रावर पोहचा आणि पाहटे पाचपर्यंत मतदान करा, असे आवाहनही ठाकरेंनी केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही Devendra Fadnavis सोशल मीडियाद्वारे ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. मुंबईतील मतदान संथ गतीने होते आहे, याबाबत आम्ही सर्वात आधी निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे. आता पराभव दिसून लागल्याने ठाकरेंचे रडगाणे पुन्हा सुरू झाले, असा टोला फडणवीसांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, MNS
Sandipan Bhumare News: लोकसभा निवडणूक निकालाआधीच भुमरेंना विधानसभा निवडणुकीतही घरी बसवण्याची तयारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com