Sandipan Bhumare News: लोकसभा निवडणूक निकालाआधीच भुमरेंना विधानसभा निवडणुकीतही घरी बसवण्याची तयारी...

Chhatrapati Sambhajinagar Loksabha Election 2024 : लोकसभा मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडी- एमआयएम यांच्यात तिरंगी लढत झाली.तीनही पक्षांकडून विजयाचे आणि मताधिक्याचे दावे केले जात असले तरी ठामपणे कोणीच अंदाज लावू शकत नाहीये.
Sandipan Bhumare
Sandipan BhumareSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला.आधी तिकीटावरुन सुरू असलेली रस्सीखेच आणि नंतर आरोप- प्रत्यारोपांनी पेटलेलं राजकारण यांनी हा मतदारसंघ धगधगता राहिला. यातच शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंविरोधात संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली.यामुळे दोन दिग्गज उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भुमरेमामांसाठी संभाजीनगरमध्ये तळ ठोकला.पण आता लोकसभा निवडणूक निकालाआधीचा भुमरेंना विधानसभा निवडणुकीतही घरी बसवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.

लोकसभा मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडी- एमआयएम यांच्यात तिरंगी लढत झाली. तीनही पक्षांकडून विजयाचे आणि मताधिक्याचे दावे केले जात असले तरी ठामपणे कोणीच अंदाज लावू शकत नाहीये. अशावेळी लोकसभेच्या निकालाची वाट न पाहता शिवसेना ठाकरे गटाने भुमरेंच्या पैठण विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. भुमरे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्याकडे पैठण विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

Sandipan Bhumare
Chandrashekhar Bawankule Letter : मतदान संपताच बावनकुळेंनी बडवला विजयाचा ढोल; BJP कार्यकर्त्यांसाठी पत्र; म्हणाले...'

त्यांच्याविरोधात ठाकरे गट कोणाला मैदानात उतरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भुमरे यांचे कट्टर विरोधक दत्ता गोर्डे यांना काही महिन्यापुर्वी ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला होता. पैठण विधानसभेच्या राजकारणात गोर्डे विरुद्ध भुमरे असा सामना यापूर्वी पहायला मिळाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना पुन्हा विधानसभेला रंगण्याची शक्यता आहे. याची तयारी ठाकरे गटाने आतापासूनच सुरू केली आहे.

महायुतीकडून लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरात मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी निवडणूक लढवली.त्यांचा स्वतःचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत येत असताना भुमरे यांनी संभाजीनगरात उमेदवारी घेतली. महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात बाहेरचा विरुद्ध स्थानिक असा मुद्दाही उपस्थितीत केला.याशिवाय दारूवाला पाहिजे की पाणी पाजणारा? अशी आक्रमक भूमिका घेत शिवसेना ठाकरे गटाने भुमरे यांना घेरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर 13 मे रोजी झालेल्या मतदानाचा आढावा ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडून घेतला जात आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत असतांना आज त्यांनी पैठणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना झालेल्या मतदानाचा आढावा घेतानाच संभाजीनगर लोकसभा निडवणुकीचा निकाल काहीही लागो, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पैठणमध्ये गद्दारांना गाडायचंच असा निर्धार दानवे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आला.

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत गद्दारांना गाडून निष्ठावंत शिवसैनिकांच्या विजयाचा संकल्प पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत करण्यात आला. संपूर्ण पैठण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. गद्दारी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावार संघटनेतील पदे रिक्त असून याठिकाणी नियुक्ती होणे आवश्यक असल्याची सुचना दानवे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Sandipan Bhumare
Special Analysis : महायुती की महाविकास आघाडी ? अखेरच्या टप्प्यात हे मुद्देच ठरणार कळीचे

आपापल्या कार्यक्षेत्रात संघटनेचे कामकाज वाढविले पाहिजे. आगामी काळात संपूर्ण तालुक्याचा दौरा करणार असून गाव पातळीपर्यंत भेटीगाठी घेणार असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले. परंतु उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर वरिष्ठ पदाधिकारी यांनी तालुक्याचे आठवडा निहाय दौरे सुरु करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी संभाजीनगर लोकसभा जिंकण्यासाठी धन शक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

परंतु येथील मतदारांनी त्यांना नाकारले आहे. कशाच पद्धतीने ते ही निवडणूक जिंकत नसल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. बैठकीला उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे,अंकुश रंधे, विधानसभा प्रमुख बद्रीनारायण भुमरे, तालुकाप्रमुख मनोज पेरे,आनंद भालेकर, शहरप्रमुख अजय परळकर, महिला आघाडी जिल्हा संघटक राखीताई परदेशी, शहर संघटक स्वातीताई माने, युवासेना जिल्हा युवाधिकारी शुभम पिवळ व तालुका युवाधिकारी विकास गोर्डे उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Sandipan Bhumare
Jalna Loksbha Constituency : जालन्यात सत्तार-खोतकर जोडीचा डाव दानवे उधळून लावतील का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com