शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल

मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेवरुन मनसे-शिवसेना यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल
sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तरसभेनंतर शिवसेना (shivsena)-मनसे (mns)वाद पेटला आहे. सध्या दोघांचीही बॅनरबाजी सुरु आहे. मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेवरुन मनसे-शिवसेना यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसापूर्वी राज ठाकरे (raj thackeray)यांना डिवचण्यासाठी शिवसेनेनं राज ठाकरेंना मुस्लिम धर्मीय टोपी घातलेला फोटो होता. त्यावर काल, आज, उद्या असा उल्लेख होता. त्याला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्षेप घेतला. येत्या ३ मेपर्यंत भोंगा न उतरवल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. त्याला शिवसेनेचे हे बॅनर लावले होते. त्यानंतर आज मनसेकडून त्याच्या उत्तर देण्यासाठी बॅनर लावले आहे. मनसैनिक गणेश अरुण कदम यांनी आपल्या फेसबूकवरुन हे बॅनर शेअर करण्यास आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो शेअर केले आहेत. यात पण काल, आज आणि उद्या ? असे शीर्षक देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. तर आज ते काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि उद्या कोणा सोबत असतील असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल
नाना पटोले अडचणीत, भाजप खासदाराचा गैाप्यस्फोट ; CBIचैाकशी होणार

दुसऱ्या एका फोटोमध्ये ही काल, आज आणि उद्याची शक्यता असं दाखवण्यात आलं आहे. काल या नावाखाली बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे छायाचित्र आहे. आज या नावाखाली सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. तर उद्याची शक्यता या नावाखाली आदित्य ठाकरे एमआयएम सोबत असल्याचे दाखविले आहे.

शिवसेना-मनसे वाद पेटला : 'काल, आज आणि उद्या' पुन्हा व्हायरल
राजसाहेबांनी लोकांच्या समस्या सोडवायच्या अन् तुम्ही काय फक्त टेंडर मधलं कमिशन खाणार?

भोगे उतरविण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला ३ मे ही मुदत दिली आहे. पण त्या अगोदर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरवात केली आहे. मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख (Irfan Shaikh) यांनी काल (गुरुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com