मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेनंतर आज (12 एप्रिल) ठाण्यात 'उत्तरसभा' होणार आहे. या उत्तरसभेसाठी मनसे नेते संदिप देशपांडे (sandeep Deshpande) यांनी ट्विट करत सूचक इशारा दिला आहे. "राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना "लावरे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची उत्तरसभा" असे ट्विट सूचक इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे या उत्तरसभेसाठी मनसेने एक टीझरही लाँच केला आहे. या टीझरवरुन एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ट्विटरवर लाँच रिलीज केलेल्या टीझरमध्ये जो आवाज वापरण्यात आला आहे तो कोणाचा आहे? काहींनी हा आवाज राज ठाकरे यांचा असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काहींच्या मते हा आवाज बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thacekray) एखाद्या जुन्या सभेतील असावा असे म्हणत आहेत.
मनसे नेते आणि एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर हा टीझर लॉंच केला आहे. '' वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलंच आहे'' असं या ट्विझरमध्ये म्हटलं आहे. खास बाब म्हणजे या टिझरमध्ये, होय हिंदूधर्माभिमानी, अशा ओळी भगव्या रंगात लिहल्या आहेत.
गुढीपाडवा मेळाव्याच्या सभेपासून राज ठाकरे आणि मनसे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. कट्टर हिंदूत्ववादी भूमिका घेत मशिदींवरील भोंग्यांना जोरदार विरोध केला. त्यांच्या भुमिकेमुळे मनसेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे भाजपने त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करत त्यांना पाठिंबा दिला तर सत्ताधारी शिवसेनेने मात्र राज यांच्या भूमिकेवर टीका केली. असं असतानाही राज ठाकरे हे आज ठाण्यात जाहीर सभा घेत आहेत. ज्याला त्यांनी 'उत्तरसभा' असं म्हटलं आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांचे वलय पाहता आतापर्यंत तरुणाईने त्यांना खूप साथ दिली, पण गेल्या काही वर्षांत त्यांची ही जादू काहीशी कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी आजही राज्यातले लाखो तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहतात. याआधीही राज यांनी विविध मुद्द्यांवर आवाज उठवत आंदोलने केली. मात्र, गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी जी भूमिका घेतली त्याला मनसेतूनच काहीसा विरोध पाहायला मिळाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.