Video EVM & Mobile : मोबाईल EVM ला कनेक्ट होतो का? निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितलं

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar : एकएक मत दोन्ही उमेदवारांचे भवितव्य ठरणार होते. त्यामुळे अधिकाऱ्यांसाठी मतमोजणी महत्त्वाची होती.
EVM
EVMSarkarnama

Election Commission on EVM : मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून फक्त ४८ मतांनी शिंदे गटाचे रवींद्र वायकर निवडून आलेले आहेत. या कमी मतांच्या फरकाने मतमोजणीत फेरफार झाल्याचा आरोप ठाकरे गटासह त्यांचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांनी केला आहे. त्यातच मतदान केंद्रावर वायकरांच्या नातेवाईकाकडे मोबाईल सापडल्याने त्या आरोपांना खतपाणी मिळाले. मात्र त्या मोबाईलमुळे इव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नसल्याचा दावा निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी केला आहे.

सध्या मोबाईलच्या माध्यमातून ओटीपी घेऊन मतमोजणीत फेरफार केल्याची चर्चा आहे. हा आरोप फेटाळताना सूर्यवंशी म्हणाल्या, इव्हीएमला अनऑक करायला कोणत्याही प्रकारचा ओटीपी लागत नाही. ईव्हीएम स्टँडअलोन सिस्टिम असलेल्या टेक्नोलजीवर काम करते. त्याला कम्युनिकेशन डीव्हाईस कनेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी करणे आणि तेथे मोबाईल असणे, याचा काहीही संबंध नाही.

मतदान केंद्रावर पोलिंग एजंट देखील असतात. त्यांच्यासमोर हे सर्व होत असते. काही लोकांना आम्ही मोबाईल ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यात निवडणूक अधिकारी होते. त्यातच एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांचा समावेश होता. तोच मोबाईल वायकरांचे मेहुणे मंगेश पंडलीकर यांनी घेतला होता.

त्याबाबत जो काही गोंधळ झाला त्याची माझ्याकडे कोणतीच तक्रार नव्हती. त्याच वेळी मतमोजणी घासून सुरू होती. एकएक मत दोन्ही उमेदवारांचे भवितव्य ठरणार होते. त्यामुळे माझ्यासाठी मतमोजणी महत्त्वाची होती, याकडेही सूर्यवंशींनी लक्ष वेधले.

सीसीटीव्हीबाबत सूर्यवंशींनी सांगितले, कीर्तीकरांना सीसीटीव्ही देतो असे सांगितले होते. मात्र कायदेशीर तरतूदींचे पालन न करता गोष्टी करता येत नाही. त्यामुळे सीसीटीव्हीबाबत कोर्टाकडून निर्णय येत नाही, तोपर्यंत ते कोणालाही दिले जाणार नाही. पोलिसांनाही सीसीटीव्ही दिले जाणार नाही, असेही सूर्यवंशींनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com