BJP V/s Congress : निरुपम यांची भाजपची वाट खडतर? मोहित कंबोज म्हणाले, 'काँग्रेसचा कचरा...'

Mumbai Political News : निरुपम यांनी आपल्या जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित केली. हिंदूविरोधात जात त्यांनी बीफ पार्टीचे आयोजन केले होते. तसेच त्या पार्टीचे समर्थनही केले होते. त्यांनी वारंवार भाजप नेते, पदाधिकाऱ्यांवर व्यक्तिगत हल्ले केले आहेत.
Mohit Kamboj
Mohit KambojSarkarnama
Published on
Updated on

Mumbai BJP Politics : लोकसभेच्या तोंडावरच काँग्रेसअंतर्गत वायव्य मुंबई मतदारसंघावरून धुसफूस सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या वतीने येथून ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर Amol Kirtikar यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटासह काँग्रेसश्रेष्ठींवर टीकेची झोड उठवली.

परिणामी काँग्रेसने त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. दरम्यान, निरुपम भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. मात्र, तत्पूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी निरुपम यांच्यावर सडकून टीका केली. Mumbai BJP Mohit Kamboj personally attack on Sanjay Nirupam.

संजय निरुपम Sanjaya Nirupam यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचा दावा केला. राजीनाम्यानंतर निरुपम यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. कारवाई केल्यानंतरही निरुपम लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी निरुपम यांचा चांगलाच समाचार घेतला.

Mohit Kamboj
Shirur Lok Sabha Constituency : उमेदवारी मिळाली; पण बदललेले चिन्ह मतदारांपर्यंत पोचविताना कोल्हे-आढळरावांची दमछाक

काँग्रेसचा कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये फेका, घरात आणण्याची गरज नाही, अशा शब्दांत कंबोज Mohit Kamboj यांनी निरुपम यांना सुनावले आहे. ते म्हणाले, काँग्रेसने त्यांचा कचरा रस्त्यावर टाकला आहे. तो कचरा आता डम्पिंग ग्राउंडवर टाका, आपल्या घरात, पक्षात आणण्याची काही गरज नाही. निरुपम यांच्या हलक्या चरित्र्याचा आहे, अशी टीकाही कंबोज यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निरुपम यांनी आपल्या जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर शंका उपस्थित केली. हिंदूविरोधात जात त्यांनी बीफ पार्टीचे आयोजन केले होते. तसेच त्या पार्टीचे समर्थनही केले होते. त्यांनी वारंवार भाजप नेते, पदाधिकाऱ्यांवर व्यक्तिगत हल्ले केले आहेत. त्यांना आपल्या पार्टीत घेतले तर त्यापेक्षा दुसरे कोणतेही दुर्भाग्य नाही, असेही कंबोज म्हणाले.

कंबोज यांनी केलेल्या टीकेवर निरुपम यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली. ते माझे जुने मित्र आहेत. आमच्यातील जे काही वाद असतील ते आम्ही दोघे मिळून सोडवू, असे म्हणत निरुपम यांनी कंबोज यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, निरुपम हे मुंबईतील काँग्रेसचा Mumbai Congress आक्रमक चेहरा अशी ओळख होती. ते वायव्य मुंबईतून इच्छुक होते. मात्र, या ठिकाणी ठाकरे गटाने कीर्तिकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर निरुपम यांनी सतत ठाकरे गटासह काँग्रेसला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Mohit Kamboj
Lok Sabha Election: शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष..., शिंदे गटाने उमेदवार बदलताच ठाकरे गटाचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com