TET Exam Scam : टीईटी प्रकरणात आता ईडीची एन्ट्री ; मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद

तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.
TET Exam Scam, ed
TET Exam Scam, edsarkarnama

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 240 कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले आहे. परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ed) मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) झालेल्या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी होत चालली आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत.

राज्य परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचा आणि एक मुलाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

TET Exam Scam, ed
Maharashtra Cabinet : प्रवीण दरेकरांचा पत्ता कट होणार... हे आहे कारण

आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या संबंधित उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com