शिंदे सरकार बरखास्त करण्याचा प्रस्ताव; कॉंग्रेसचा बडा नेता घेणार राज्यपालांची भेट

Eknath Shinde| Congress| परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Eknath Shinde & Devendra Fadanvis
Eknath Shinde & Devendra FadanvisSarkarnama

Nana Patole | मुंबई : राज्यभरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आणि शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आज (30 ऑक्टोबर ) माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी राज्य सरकारवही सडकून टीका केली.

परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावरुन शेतकऱ्यांसह विरोधी पक्षांकडूनही राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुरु आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबतच आता शिवसेना आणि काँग्रेसनेही सरकारला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

Eknath Shinde & Devendra Fadanvis
महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा का काढली? भास्कर जाधवांनी सांगितलंं कारण

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण अजूनही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळत नसेल तर सरकार काय करत आहे, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ते टोकाचा पावले उचलत आहेत. यामुळे राज्य सरकार बरखास्त करण्यासाठी आम्ही राज्यपालांनी भेटणार असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार काळात शेतकऱ्यांना 10 हजार रुपयांची रोख मदत केली होती. त्यानंतर दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर केले होते. शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदतनिधी जमा केला होता. पण सध्याच्या सरकार नियम दाखवून शेतकऱ्यांना मदत देण्यात चालढकल करत आहे. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असायला पाहिजे, पण शिंदे-भाजप सरकार तर शेतकरी विरोधी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com