Raj Thackeray : 'लाव रे तो व्हिडीओ'च्या सभांना जी धार होती ती अजूनही तशीच आहे का? कोल्हेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंचे स्पष्ट उत्तर...

Amol Kolhe, Amrita Fadnavis : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली.
Raj Thackeray, Amol Kolhe, Amrita Fadnavis
Raj Thackeray, Amol Kolhe, Amrita FadnavisSarkarnama

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुलाखत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नावर सडेतोड उत्तरे दिली.

खासदार कोल्हे यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचाराल होता की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. त्यामध्ये राज ठाकरे यांनी अनोखा प्रयोग करत व्हिडीओच्या माध्यामातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभांमधील भाषणावर टीका केली होती. त्यावरुनच अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता.

Raj Thackeray, Amol Kolhe, Amrita Fadnavis
Sanjay Raut News: राहुल कुलांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा थेट आरोप; म्हणाले, 36 कोटी खाल्ले

अमोल कोल्हे म्हणाले यांनी प्रश्न विचारला होता. लावरे तो व्हिडीओच्या सभांना जी धार होती ती अजूनही तशीच आहे का? त्यावर राज ठाकरे म्हणाले, मला जेव्हा टीका करायची तेव्हा मी टीका करणारच. पण प्रत्येक वेळी टीका करणे गरजेचे नाही. पुन्हा तसा प्रश्न आला तर मी टीका करणारच, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नावरही ठाकरे यांनी भन्नाट उत्तरे दिली. आजकाल राजकारणात खूप टाळी देणे आणि डोळे मारणे सुरु आहे? यावर तुमचे म्हणणे काय? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, ज्यांना त्या वयात त्यांच्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, असतील म्हणून काही राजकारणी तसे करत असतील.

Raj Thackeray, Amol Kolhe, Amrita Fadnavis
Sanjay Ratu News : यापुढे संजय राऊतांवर फडणवीस, बावनकुळे बोलणार नाहीत, 'हे' आहे कारण...

आगामी काळात कुणासोबत युती करणार? असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला, त्यावर राज ठाकरेंनी भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणासोबत आहेत तेच कळत नाही, अशा शब्दांत ठाकरे यांनी टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com