Sanjay Raut News: राहुल कुलांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा थेट आरोप; म्हणाले, 36 कोटी खाल्ले

Sanjay Raut : ''144 कलम लावलं पण तरी मी कारखान्यात घुसलोच..''
Sanjay Raut and Rahul Kul
Sanjay Raut and Rahul KulSarkarnama
Published on
Updated on

Pune News : खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यातील वरंवड येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर जोरदार टीका करत भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी आज भीमा पाटस कारखान्यावर येऊन कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय मधुकरनाना शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मात्र, भीमा पाटस कारखान्यावर 144 कलम लागू करण्यात आले होते. यावरूनही त्यांनी पोलिसांना आणि सरकारला चांगलच सुनावलं.

राऊत म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त जो भष्ट्राचार करतो त्याच्याच प्रचाराला जातात. जो भष्ट्राचार करत नाही त्याला भाजपमध्ये स्थान नाही. भाजपमधील भष्ट्राचार करणाऱ्यांचा भष्ट्राचार कोटीत असतो", असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

Sanjay Raut and Rahul Kul
PCMC News : प्रशासक राजवटीत कामे मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवकांना आमदार, खासदारांचा आधार

"खरं तर मी रमेश थोरातांचा अभारी आहे. त्यांनी माझ्याकडे सहकार क्षेत्रातील एवढा मोठा भष्ट्राचार आणला. मी कारखान्यावर येऊ नये म्हणून 144 कलम लावलं. मला हे तुरूगांतून बाहेर येण्यापासून रोखू शकले नाही आणि येथे येण्यापासून रोखण्यासाठी 144 कलम लावलं. पण तरी मी कारखान्यात घुसलोच. कारखाना तुमच्या बापाचा नाही", असं म्हणत त्यांनी राहुल कुल यांना इशारा दिला.

"आम्ही सांगून दंगल करतो. आम्ही कुणाला घाबरत नाही. कुल यांनी 50 हजार सभासदावर अन्याय केला. 50 हजार सभासदांनी पत्र लिहिलं, पण ते भष्ट्राचाराचे बाप आहेत, त्यांना काय पत्र लिहिता. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. राहुल कुल यांना कारखाना चालवायला फडणवीसांनी 36 कोटी दिले. तुम्ही ते देखील खाल्ले. त्यामुळे त्यांना फडवीसांनी अटक करावी. या भष्ट्राचाराबद्दल मी सीबीआयकडे तक्रार केली. आता सीबीआय काय करतं पाहावं लागेल. त्यानंतर इडीकडे तक्रार करावी लागेल", असंही ते म्हणाले.

Sanjay Raut and Rahul Kul
Adinath Sugar Factory : करमाळ्याच्या पुढाऱ्यांना धक्का : आदिनाथ कारखाना 'या' कारणामुळे गेला प्रशासकाच्या हाती

"2024 ला आपलं सरकार येणारच आहे मग पाहू तुम्हाला कोण वाचवतं. तुम्ही 500 कोटी कसे पचवता तेच पाहू. तुम्हाला कारखाना चालवता येत नसेल तर तुम्ही बाजूला व्हा. 144 कलम लावून देखील ही सभा प्रचंड मोठी झाली".

"त्यामुळे या पुढेही हे माझा आवाज दाबू शकणार नाहीत. सभा सुरू असताना मला उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि विचारलं की काय वातावरण आहे? त्यांना सांगितलं की जोरात सुरू आहे. त्यांनी विचारलं की 144 कलम? मी सांगितलं की, 144 कलम तोडून टाकलं", असं ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com