बाळासाहेबांच्या शिवसेनेला काहीही धोका नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या कोंडाळ्याला...

Navneet Rana|Shivsena|Uddhav Thackeray : आता जे काही घडत आहे ते शिवसेनेने मूळ हिंदुत्वाची विचारधारा सोडल्यानेच होत आहे.
Mp Navneet Rana-Cm Uddhav Thackeray
Mp Navneet Rana-Cm Uddhav ThackeraySarkarnama

Navneet Rana : गेल्या काही दिवसांपासून राज्याच मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळाली आहे. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत शिवसेनेला (Shivsena) मोठे खिंडार पाडले आहे. आधी आपल्या सोबत 40 आमदारांना सोबत घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पाडले यानंतर त्यांनी शिवसेनेतील 12 खासदारांना आपल्या गळाला लावत सेनेला मोठा हादरा दिला आहे.

दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १२ खासदारही गेल्याने आता पक्ष ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली आहे.मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काहीही धोका नाही मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्यासोबत राहणाऱ्या कोंडाळ्याला नक्कीच धोका आहे, अशी खोचक टीका राणा यांनी केली . त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

Mp Navneet Rana-Cm Uddhav Thackeray
OBC Reservation : 'हा विजय ओबीसींच्या हक्कांचा अन् महाविकास आघाडीच्या प्रयत्नांचा'

खासदार राणा म्हणाल्या, शिवसेनेला आज ५६ वर्षे झाली आणि इतका जुना पक्ष असूनही आता जे काही घडत आहे ते शिवसेनेनी मूळ हिंदुत्वाची विचारधारा सोडल्यानेच होत आहे. ज्यांनी सतरंज्या, खुर्च्या उचलल्या आपलं रक्त आटवलं अशा शिवसैनिकांनी आज वेगळं होण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाचा निकालही त्यांच्याच बाजूने लागेल, असा विश्वास वाटतो, असे मत राणा यांनी व्यक्त केली.

येत्या काळात अनेक गोष्टी बदलणार आहेत. आता १२ खासदारही शिंदेंसोबत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत जे प्रकरण कोर्टात आहे त्यामध्येही शिंदेंच्या बाजूने निर्णय लागेल. यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला काही धोका नाही. मात्र, उद्धव ठाकरेंसोबत राहणाऱ्या कोंडाळ्याला नक्कीच धोका आहे, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

Mp Navneet Rana-Cm Uddhav Thackeray
जीवघेण्या आजारातून उठलेले आमदार जगताप पुन्हा सक्रिय ; पालिका आयुक्तांना धरले धारेवर

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आता न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन.व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर हे प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे जाण्याची शक्यता जाणकारांच्या मते वर्तवण्यात येत आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर सरन्यायाधीशांनी दोन्ही पक्षांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. तर पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com