मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंची मोठी घोषणा

सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,'' असे संभाजीराजेंनी सांगितले.
MP Sambhajiraje
MP Sambhajirajesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''मराठा आरक्षणासाठी काही दिवसात मी अनेक आंदोलन केली. सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे गेलो. पण अद्यापही कोणतीच मागणी पूर्ण केलेली नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो,'' अशी खंत खासदार संभाजीराजे (MP Sambhajiraje)यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ''मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) २६ फेब्रुवारीला आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,'' असे संभाजीराजेंनी यावेळी जाहीर केले.

संभाजीराजे म्हणाले, '' मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं |

''मराठा समाज देखील वंचित घटक आहे. 2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,'' असे संभाजीराजेंनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, ''मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी चर्चा केली आहे,''

MP Sambhajiraje
प्रभाग बदलाच्या पालिका आयुक्तांच्या अध्यादेशाविरोधात जनहित याचिका दाखल

''सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या. मी सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केलं परंतू, यांनी काहीच केलं नाही,'' असे संभाजीराजे म्हणाले.

खासदार संभाजीराजे यांनी मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं देखील केली. याशिवाय मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी सरकारपुढे ५ मागण्या ठेवल्या होत्या. मात्र त्या मागण्यांची अद्याप पुर्ताता झालेली नाही.

मराठा आरक्षणासोबतच संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदतही येत्या जून महिन्यामध्ये संपत आहे. मात्र पक्षीय चौकटीत न अडकल्याने भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार यावरुन चर्चा सुरु असतानाच नुकत्याच त्यांनी वाढदिवसादिवशी लिहिलेल्या फेसबूक पोस्टमधून चर्चांना अधिक हवा मिळाली होती. यातून ते भाजपची साथ सोडणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com