...त्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ; राऊतांचा सरसंघचालकांना टोला

सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अंखड हिंदुस्थान ही संकल्पना राबवली, रुजवली त्यांचे आभार माना.
Mohan Bhagwat,Sanjay Raut
Mohan Bhagwat,Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल,'' असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी केलं आहे. ''हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे,'' असेही मोहन भागवत म्हणाले, त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाष्य केलं आहे.

मोहन भागवत यांनी हरिद्वारमध्ये कनखल संन्यास रोड भागात श्रीकृष्ण निवास आश्रम आणि पूर्णानंद आश्रम या ठिकाणी ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या या विधानावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''अंखड भारताचे स्वप्न कुणाचे असेल तर आम्ही त्याचे आम्ही स्वागतच करतो. त्याला देशातील कुठलाही पक्ष विरोध करणार नाही, यापूर्वी भाजपनं या मुद्दांवर मते मागितली. आधी पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, अफगाणीस्तान घ्या, मग एक अखंड भारत निर्माण करा. जो भाग यापूर्वी हिंदुस्थानचा होता, तो भाग घ्या. त्याआधी स्वांतत्रवीर सावरकरांना भारतरत्न द्या, सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अंखड हिंदुस्थान ही संकल्पना राबवली, रुजवली त्यांचे आभार माना. काश्मिरी पंडीतांना पुन्हा परत आणा,'' असा टोला राऊतांनी लगावला.

Mohan Bhagwat,Sanjay Raut
फक्त रामदास आठवलेंचं कल्याण झालं, समाजाच्या वाट्याला काय आलं?

मोहन भागवत म्हणाले, ''भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. अगदी त्याचप्रकारे संत आणि महंत यांच्या आशीर्वादाने लवकरच अखंड भारताची निर्मिती होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षातच अखंड भारताची निर्मिती होईल,''

''अखंड भारत हा अजेंडा कायमच महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातला अखंड भारत १० ते १५ वर्षात होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जो या मार्गात येईल तो संपेल,'' असे मोहन भागवत यांनी सांगितलं.

Mohan Bhagwat,Sanjay Raut
सोमय्यांनी जास्त वचवच करु नये, आणखी प्रकरणे बाहेर काढणार ; राऊतांचा इशारा

''भारत आत्ता प्रगती पथावर आहे. या मार्गात जो कुणी येईल तो संपून जाईल. भारताची प्रगती होणार म्हणजे होणारच. मागच्या एक हजार वर्षांपासून भारतातला सनातन धर्म संपवण्यासाठीचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. मात्र, आजही सनातन धर्म आहे. भारत हा जगातला असा देश आहे जिथे जगातल्या प्रत्येक व्यक्तीची दुष्ट प्रवृत्ती संपते. जो कुणी भारतात येतो तो दुष्ट प्रवृत्ती सोडून देतो किंवा स्वतःच संपतो,'' असे सरसंघचालक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com