Sanjay Raut On BJP: 'अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण देणारं भाजप कोण ?'; संजय राऊतांनी सुनावलं

Ram Mandir Pratishthapana : 'आम्हाला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही'; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Mumbai News: अयोध्या नगरीत 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी मोठ्या उत्सवाची तयारी सुरू आहे. मात्र, या सोहळ्याच्या निमंत्रणावरून आता राजकारण सुरु झालं आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरूनच खासदार संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत 'अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण देणारं भाजप कोण ? आम्हाला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही', असा सवाल करत भाजपला सुनावलं आहे.

"संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जात आहे की तुम्हाला निमंत्रण आलं का ? हा भाजपचा कार्यक्रम आहे, प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा उत्सव नाही. यूपीमध्ये आणि दिल्लीत भाजप सरकार आहे. त्यामुळे हा भाजपचा कार्यक्रम आहे, त्यांना तो करू द्या. अयोध्येतील सोहळ्याचं निमंत्रण देणारं भाजप कोण आहे ? आम्हाला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही. भाजपचा कार्यक्रम संपल्यावर आम्ही राम लल्लाच्या दर्शनाला जाऊ", असं राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Ahmednagar Politics : उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याने टार्गेट केलं जातंय; शंकरराव गडाख स्पष्टच बोलले!

"प्रभू श्रीरामाशी भाजपचं काही नात नाही. अयोध्येतील सोहळ्याचं राजकारण सुरु आहे. पण अशा प्रकारचं राजकारण या देशात याआधी कधी झालं नाही. सध्या एका उद्योगपतीला संपूर्ण देश दिला जात आहे. अयोध्येचा सातबारा देखील भाजप (BJP) उद्योगपतीला देईल", अशा शब्दात राऊतांनी भाजपवर घणाघात केला.

'भारत न्याय यात्रे'वर राऊत काय म्हणाले ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'चं दुसरं पर्व अर्थात 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. ही यात्रा 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत जवळपास 6 हजार 200 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे. या यात्रेवर खासदार संजय राऊतांनी भाष्य करत राहुल गांधींचं स्वागत केलं. "या देशात संविधान, सत्य, न्याय वाचवण्याची गरज आहे, त्यामुळे 'भारत न्याय यात्रा' काढणं गरजेचं आहे, राहुल गांधी निघाले आहेत आणि जनता त्यांच्यासोबत आहे. 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमातून समाज जोडण्याचं काम राहुल गांधींनी केलं", असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Sunil Kedar News : तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या सुनील केदारांचे पोस्टर झळकले; काँग्रेस महारॅलीत कट्टर समर्थकांचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com