Ladaki Bahin Yojana: संजय राऊतांचा 'आजचा विनोद' तुम्ही वाचला का? फडणवीस म्हणाले, आम्हाला ओळखले का?

MP sanjay raut criticizes ladaki bahin yojana:फडणवीस म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणी, आम्हाला ओळखले का? मी फडणवीस, हे एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार. आम्ही तुम्हाला उठायला मदत केली.
MP sanjay raut criticizes mahayuti ladaki bahin yojana
MP sanjay raut criticizes mahayuti ladaki bahin yojanaSarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे लाभार्थींच्या खात्यात जमा होण्यास कालपासून (बुधवार) सुरवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी 'लाडकी बहीण'योजनेवरुन शिंदे-फडणवीस-पवार सरकारची खिल्ली उडवली आहे.

संजय राऊत यांच्या या मिश्किल टिप्पणीवर नेटकरी प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. महायुतीच्या नेत्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्याचे सध्या तरी टाळलं आहे. राऊतांनी टि्वट करीत 'आजचा विनोद' असे शीर्षक देत सताधाऱ्यांना चिमटा काढला आहे.

“आजचा विनोद”असे शीर्षक देत राऊत म्हणतात, एक बाई ओढ्यावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली. मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार होते. त्यांनी बाईला उठायला मदत केली. बाईने त्यांना धन्यवाद दिले. फडणवीस म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणी, आम्हाला ओळखले का? मी फडणवीस, हे एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार. आम्ही तुम्हाला उठायला मदत केली. 2024 मध्ये आम्हालाच मत देणार ना? बाई हसल्या आणि म्हणाल्या की, “लाडक्या भावा, मी पाठीवर पडले आहे, डोक्यावर नाही.”

वरळी आणि कोकणात काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. पण त्यानंतरही अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु राहणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळी येथे वास्तव्यास असणारी महिला ही लाडकी बहीण योजनेची राज्यातील पहिली लाभार्थी महिला ठरली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सत्ताधारी देखील या योजनेचा गाजावाजा करत आगामी विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याची तयारी करत आहेत.

एकनाथ शिंदे म्हणतात...

"योजनेसाठी सध्या तांत्रिक चेकींग सुरू आहे. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, म्हणून आम्ही खबरदारी आम्ही घेत आहोत. उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com