Sanjay Raut : राज्यपाल अजूनही राजभवनात कसे ? ; राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Sanjay Raut : राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांनी धिक्कार केला असता तर त्यांच्या अभिवादनाचे महत्व नक्कीच वाढले असते.
Eknath Shinde , Sanjay Raut
Eknath Shinde , Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut : प्रतापगडावर आज (बुधवारी) तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन (chhatrapati shivaji maharaj)मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त प्रतापगडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रतापगडावर दाखल झाले आहेत.

ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शिवप्रताप दिनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतापगडावरील उपस्थितीवरुन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना अधिकार नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

Eknath Shinde , Sanjay Raut
Eknath Shinde : धैर्यशील माने यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सोपवली मोठी जबाबदारी

"राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. मात्र, मुख्यमंत्री शिंदे तोंड शिवून बसले आहेत. त्यामुळेच राज्यपाल अजूनही राजभवनात विराजमान कसे," असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांनी धिक्कार केला असता तर त्यांच्या अभिवादनाचे महत्व नक्कीच वाढले असते," असे राऊत म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांच्यावर राऊतांनी निशाणा साधला आहे.ते म्हणाले, "कोश्यारी व त्रिवेदींचा धिक्कार करणे तर सोडाच उलट सरकार त्यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आज गडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा त्यांना अधिकार आहे का ?, हा प्रश्न समस्त महाराष्ट्रातील जनता विचारत आहे,"

Eknath Shinde , Sanjay Raut
Jitendra Awhad : आव्हाडांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात मनसेच्या बड्या नेत्याचा हात ?

खासदार उदयनराजे भोसले यांनी कोश्यारी, त्रिवेंदी यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर राऊत म्हणाले, "उदयनराजेंचे अश्रू आम्ही पाहले आहेत. ते केवळ त्यांचे अश्रू नाहीत तर समस्त महाराष्ट्राचे,प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील तो आक्रोश आहे. पण मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार राज्यपालांना हटवण्याबाबत हतबल आहेत. आणि आज प्रतापगडावर जाऊन ते ढोंग करत आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com