कब तक छीपोगे गोहातीमे, आना हि पडेगा चौपाटीमे ; झिरवाळांचा फोटो पोस्ट करुन राऊतांचा टोला

संजय राऊतांच्या टि्वटची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो राऊतांनी पोस्ट केला आहे.
 sanjay raut
sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे शिवसेनेत (ShivSena) दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सत्ता वाचवण्यासाठी कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाजपच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू असल्याची समजते.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज सकाळी टि्वट करीत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. या टि्वटची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो राऊतांनी पोस्ट केला आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, "गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, चौपाटीवर यावं लागेल," राऊत यांनी सामनातील अग्रलेखात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नाही.असे अनेक भूकंप होऊनही शिवसेनेचे अस्तित्व अबाधित राहिले आहे. या नाटकाचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत.

 sanjay raut
एकनाथ शिंदेंची वेळ निघून गेली, आता निर्णय ठाकरेचं घेतील !

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आज दुपारी 12 वाजता समर्थक आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. ही बैठक गुवाहाटीमध्येच होणार आहे.

"शिवसेनेच्या पाठीवर अनेक वार झाले आहेत. ते पेलवण्याची जबाबदारी होती. बाळसाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधी माफ केले नाही. एकनाथ शिंदेंना अनेक संधी दिल्या. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, आता ती वेळ निघून गेली. जो निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख घेतील," असे सांगत शिंदे गटाला 'मातोश्री'चे दार बंद केल्याचे राऊतांनी शनिवारी (ता.२५) एका वृत्तवाहिनीशी बोलताना सूचित केले आहे.

 sanjay raut
मोठी बातमी : शिंदे गटाचं नाव ठरलं ; ' शिवसेना बाळासाहेब' असे नामकरण

"जे आमदार शिवसेनेतून निवडून आले त्यांनी बंड केले. शिवसेनेने मेहनतीने या आमदारांना मोठे केले आहे. आज त्यांनी बंड केले. आज जे शिवसेनेच्या विचाराने निवडणूक लढवली. पुन्हा जनता या आमदारांना मतं देणार नाही," असे राऊत म्हणाले.

शिवसेनेची काल (शनिवारी) उच्चस्तरीय बैठक झाली. यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "शिंदे पूर्वी नाथ होते, पण आता दास झाले आहेत. बंडखोरांच्या बुडाशी बॉम्ब आहे. बाळासाहेबांचे नाव घेऊन कोणी राजकारण करू शकणार नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com