
Mumbai News : अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसलेल्या चोराने 16 जानेवारीला चाकू हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खान याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील झाली. आता सैफ अली खान हा बरा देखील झाला आहे.
परंतु त्यांच्या उपचारांवर झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीने तत्काळ मंजूर केला आहे. अभिनेता, सेलिब्रेटी म्हणून सैफ अली खान याला विमा तत्काळ मंजूर झाला. ही विशेष वगणुकीची चौकशीची मागणी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटने (AMC) विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे.
असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट ही तज्ज्ञ डाॅक्टरांची संघटना आहे. यात सुमारे 14 हजार सदस्य आहेत. अभिनेता सैफ अली खान याला तत्काळ मंजूर झालेल्या विम्याकडे लक्ष वेधताना सर्वसामान्यांना विमा कंपन्या अशी वागणूक देते का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सैफ अली खान याचे रुग्णालयातील (Hospatil) पाच दिवसांचे त्याचं बिल 35 लाख 98 हजार 700 रुपये झाले होते. त्यातील 25 लाख रुपये मेडिक्लेम विमा कंपनीने तत्काळ मंजूर केला.
AMC असोसिएशनने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेन्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे विमा नियामक प्राधिकरणाला यांना यासंदर्भात पत्र (Letter) लिहिले आहे. यात कॅशलेस क्लेम, सेलिब्रिटीज यांना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीकडे लक्ष वेधले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना किंवा लहान नर्सिंग होम यांना विमा क्लेम देताना केली जाणारी पिळवणूक किंवा मंजूर करण्यात येणाऱ्या विमा रक्कमेत दुजाभाव केला जातो, असे देखील प्रश्न या पत्रात उपस्थित केले आहेत.
डाॅक्टरांसमोर सर्व रुग्ण हे रुग्ण असतात, त्यांना आजारमुक्त करणे किंवा वैद्यकीय उपचार देणे, हा त्यांचा पहिला धर्म असतो. डाॅक्टरांपुढे सेलिब्रेटी आणि सर्वसामान्य असं काही नसते. परंतु विमा कंपन्या याप्रकरणात विशेष वागणूक दिल्याचे दिसते. त्याची चौकशी झाली पाहिजे. व्यक्तीचे समाजातील स्थान विचारत न घेता, विमाधारकांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. यासाठी कठोरातील कठोर नियम बनवावेत. कॅशलेस उपचारात सर्वसामान्य विमाधारकांचा विश्वास राहील, अशा पद्धतीने विमा कंपन्यांची अंमलबजावणी असावी. त्यात पारदर्शकता असावी, असे AMC असोसिएशनने पत्रात म्हटले आहे.
AMC असोसिएशनने आम्ही कोणत्याही हाॅस्पिटल, व्यक्तीच्या किंवा विमा कंपनीच्या विरोधात नाही. परंतु सर्वसामान्य विमाधराकांना आणि नर्सिंग होमला समान न्याय द्यावा, असा आमचा आग्रह आहे. नर्सिंगमध्ये होममध्ये उपचार घेत आहे, म्हणून कॅशलेस क्लेम नाकारायचा हे धोरण चुकीचे आहे, असे मत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट चेअरमन डॉ. सुधीर नाईक यांनी व्यक्त केले आहे.
सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्यावर चोराने चाकूने जबरी वार केले होते. लिलावती रुग्णालयातून उपचार घेऊन सैफ अली खान परतला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ठाण्यातील कासारवडवली येथून बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. या आरोपीला मदत केलेल्या महिलेला देखील पोलिसांनी शोधून काढलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.