अखेर ठरलं! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र ; बंडखोरांवर कारवाई

मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नाही तर तिन्ही पक्षांकडून थेट बंडखोरांवर पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.
अखेर ठरलं! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र ; बंडखोरांवर कारवाई
Published on
Updated on

मुंबई : मुंबै बँकेच्या (Mumbai Bank Election) संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी महिन्यात होत आहे. या निवडणुकीसाठी मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अर्ज दाखल केला आहे. मुंबै बँक निवडणुक शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता प्रतिष्ठेची केली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार मुंबै बँकेच्या निवडुकीत (Mumbai Bank Election) संदर्भात सेना (Shiv Sena) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस एकत्र येत आहेत.

शिवसेना पक्षाच्या इशारानंतर मुंबै बँक निवडणुकीतील शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी त्यांची उमेदवारी घेतली मागे. बंडखोर उमेदवार कमलाकर नाईक यांनी त्यांची उमेदवारी आज मागे नाही घेतली तर त्यांच्यावर पक्षांतर्गत मोठी करवाई करण्यात येणार आहे. कमलाकर नाईक यांनी बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू आहे

मुंबै बँक निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली नाही तर तिन्ही पक्षांकडून थेट बंडखोरांवर पक्षातून बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी हा अर्ज मजूर संस्था प्रवर्गातून दाखल केला आहे. त्यांचा अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे.

अखेर ठरलं! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र ; बंडखोरांवर कारवाई
खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जळगावात

यापूर्वीही दरेकर(Pravin Darekar) मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवर अध्यक्ष निवडून आले होते. आताही त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुंबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. त्यावर आक्षेप घेण्यात आला असून दरेकर त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. 'या नोटिशमध्ये 'आपण मजूर आहात की नाही,' अशी विचारणा करण्यात आली आहे. दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे.

''प्रवीण दरेकर प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही,'' असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना २१ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

''प्रवीण दरेकर कोणत्या अंगाने मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,'' असे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार नवी मतदार यादी तयार होणेही अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तशी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com