BJP office land transfer dispute : भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेचा वाद, हस्तांतरणात नियम अन् अटीचा भंग; रोहित पवारांची चौकशी मागणी

Rohit Pawar Objects to BJP Office Land Transfer in Mumbai : मुंबई चर्चगेट परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागा हस्तांतरणाबाबत रोहित पवारांनी आक्षेप नोंदवला आहे.
BJP office land transfer dispute
BJP office land transfer disputeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai BJP office construction : भाजप प्रदेश कार्यालयाच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

भूखंडाच्या हस्तांतरणापासून अनेक बाबतीत नियम व अटींचा भंग झाला आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. मुंबईत दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. भाजप कार्यालयाच्या भूखंड हस्तांतरणात, तर नियम व अटींचा भंग झाला आहे. केवळ भाजप कार्यालयामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आक्षेप रोहित पवार यांनी नोंदवला.

BJP office land transfer dispute
National Election Watch: भाजपच्या 75 उमेदवारांचे लीड घटले; गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्क्यांची घसरण

भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयाला चुकीच्या पद्धतीने जागा दिली आहे. हा चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याबाबत लेखी स्पष्टीकरण देण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आयुक्तांकडे भाजप जागेबाबत काय स्पष्टीकरण येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

BJP office land transfer dispute
Karnataka political controversy : विधानसभाध्यक्षांची पैशांची उधळपट्टी, भाजप खासदाराकडून 'पोलखोल'

जमीन घोटाळे जोमात

दरम्यान, रोहित पवार यांनी त्यांच्या 'एक्स'वर पोस्ट केली आहे. “राज्यात जमीन घोटाळे जोमात असताना, मुंबईत भूमिपूजन होत असलेल्या भाजप कार्यालयाच्या जागेबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सदरील जागा महाराष्ट्र हौसिंग अँड फायनान्स कॉर्पोरेशनची 99 वर्षांच्या लीजवर घेतलेली आहे. इमारत धोकादायक असल्याचे कारण देत ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्याच ठिकाणी भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झाले आहे.” असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

BJP office land transfer dispute
Satyajeet Tambe drug campaign : ड्रग्स अन् गुन्हेगारीचा विळखा, आमदार तांबेंनी पत्राद्वारे काढले वाभाडे, दिला मोठा सल्ला

रोहित पवारांचा सवाल

रोहित पवार यांनी, Lease Land, Shedule W जागा विकण्याचा पायंडा पाडला जाणार असेल तर उद्या महालक्ष्मी रेसकोर्स सारख्या अनेक महत्वपूर्ण जागा देखील खासगी लोकांच्या घशात घातल्या जातील का? असा प्रश्न देखील पोस्टमध्ये केला आहे.

जैन बोर्डिंगसारखच प्रकरण

पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण दाबण्यासाठी ज्याप्रकारे सर्व मीडिया हाऊसेसला फोन करण्यात आले, तसेच फोन मुंबईतील या जागेसाठी करण्यात आल्याचे देखील समजत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.

भाजप कार्यालयाची दहा मजली इमारत

भाजप चर्चगेट वासानी चेंबरच्या जागेत बांधत असलेले नवीन कार्यालयाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ सुमारे 55 हजार चौरस फूट इतके आहे. सध्या दहा मजली इमारत बांधली जाणार आहे. संपूर्ण चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यात येणार आहे. केंद्रीय कार्यालयाच्या धर्तीवर ही इमारत बांधली जात आहे. विख्यात वास्तुविशारद हाफीज काँट्रॅक्टर यांनी इमारतीचे डिझाइन केले आहे. सुमारे 400 जण बसण्याची सोय असलेले सभागृह, ग्रंथालय, बैठका व परिषदांचे कक्ष असणार आहे. कार्यालय दोन ते अडीच वर्षांत उभारले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com