मुंबई भाजपाध्यक्ष राज्यपालांकडे;पटोलेंना अटक करा अन्यथा उद्यापासून उपोषण

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज मुंबई प्रदेश भाजपाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना निवेदन देण्यात आले.
Mumbai BJP
Mumbai BJPSarkarnama

मुंबई : बेताल वक्तव्य करून देशाच्या पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणाऱ्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावरील कारवाईसाठी राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे. पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर उद्यापासून मुंबईत चर्चगेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसण्याचा इशारा मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिला आहे.

Mumbai BJP
‘कुकडी’च्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा राहुल जगताप

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज मुंबई प्रदेश भाजपाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना निवेदन देण्यात आले. पटोले यांच्यावर कारवाई करण्याची सूचना राज्यपाल कोश्‍यारी यांनी राज्य सरकारला करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. उद्या (ता.१९) सकाळी ११ वाजेपर्यंत पटोले यांच्यावर कारवाई झाली नाही तर चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान दिला.

Mumbai BJP
फडणवीस प्रभारी असलेल्या राज्यात भाजपला बालेकिल्ल्यातच उमेदवार मिळेना!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवन येथे जाऊन भेट घेतली. यावेळी बोलताना लोढा म्हणाले, ‘‘ पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून मुंबई भाजपा त्याचा तीव्र निषेध करत आहे.नरेंद्र मोदी देशातील जनतेच्या श्रध्दास्थानी आहेत.परंतु देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मानात एवढा द्वेष आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या शिष्टमंडळात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, उत्तर पूर्व मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष अशोक राव, मुंबई भाजपा प्रवक्ता निरंजन शेट्टी उपस्थित होते.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com