‘कुकडी’च्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा राहुल जगताप

कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) माजी आमदार राहुल जगताप ( Rahul Jagtap ) यांना यश आले.
Rahul Jagtap, NCP
Rahul Jagtap, NCPSarkarnama

रावसाहेब चक्रे

देवदैठण ( जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्याची कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. ही निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) माजी आमदार राहुल जगताप ( Rahul Jagtap ) यांना यश आले. त्यानुसार आज कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड घेण्यात आले. सर्व संचालकांनी कारखान्याच्या अध्यक्षपदी राहुल जगताप यांचीच निवड केली. तर उपाध्यक्षपदी विवेक पवार यांची निवड झाली. त्यामुळे राहुल जगताप हे सलग तिसऱ्यांदा कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. Rahul Jagtap for the third time as the chairman of 'Kukadi'

सहायक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या वेळी ओम गुरुदेव महिला पतसंस्थेच्या माजी अध्यक्ष अनुराधा जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नगराध्यक्ष मनोहर पोटे, ओम गुरुदेव महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष प्रणोती जगताप आदी उपस्थित होते. अध्यक्ष राहुल जगताप यांनी कारखाना बिनविरोध करून नेतृत्वाच्या परिपक्वतेची जाणीव करून दिली.

Rahul Jagtap, NCP
"कुकडी' बिनविरोधच्या हालचाली, राहुल जगताप निर्धास्त

उपाध्यक्षपदासाठी संभाजी देवीकर, निवृत्ती वाखारे इच्छुक असल्याची चर्चा होती. याबाबत अध्यक्ष राहुल जगताप यांच्याकडे अनेक शिफारशी करण्यात आल्या. त्याबरोबरच सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी उपाध्यक्षपदासाठी संधी मिळण्याकरिता धुमाकूळ घातला.

येळपणे गटातील ज्येष्ठ संचालक विवेक पवार यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सूचना मनोहर शिंदे यांनी मांडली, तिला मोहन कुदांडे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदाची सूचना निवृत्ती वाखारे यांनी मांडली, तिला संभाजी देवीकर यांनी अनुमोदन दिले. या वेळी आजी-माजी अनेक संचालक उपस्थित होते.

Rahul Jagtap, NCP
नगरमध्ये कोरोनाची तिसरी लाट तीव्र : एकाच दिवसात 1432 रुग्ण

शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्षातून (स्व.) तात्यांनी हा कारखाना उभा केला. कुकडी कारखाना निवडणूक बिनविरोध करताना अनेकांनी मदत केली. सर्वसामान्य सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवीन. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेतले जाईल.

- राहुल जगताप, अध्यक्ष, कुकडी कारखाना

कारखाना बिनविरोध झाला असला, तरी शेतकरीहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. वडीलकीच्या नात्याने आम्ही राहुल जगतापांच्या पाठीमागे आहे. आमच्यात कुठलेच अंतर नाही. आमच्या घरातील विषय सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. नवीन संचालकांनी ऊसतोडणीत नियमितता आणावी.

- घनश्याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कुकडी कारखान्यात नेहमीच सामान्य माणसांना संधी दिली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अध्यक्ष राहुल जगताप यांनी टाकलेला विश्वासाला सार्थ ठरवीन. शेतकरीहितासाठी ‘कुकडी’च्या माध्यमातून काम करणार आहे.

- विवेक पवार, उपाध्यक्ष, कुकडी कारखाना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com