Maharashtra local body elections : 'स्थानिक'च्या निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाणार? गायकवाड, अहिर अन् देशपांडेंना मतदार याद्यांमध्ये घोळाची भीती

Mumbai Congress, Shiv Sena, MNS Leaders Predict BJP Mahayuti May Postpone Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या न्यायालयाच्या आदेशावर मुंबईतील विरोधक लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत.
Maharashtra local body elections
Maharashtra local body electionsSarkarnama
Published on
Updated on

Local body polls postponement Maharashtra : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुढील चार महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक घेण्यास कुचराई केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

तसेच निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने आदेश दिला असला, तरी राज्यातील विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पुन्हा पुढे ढकलल्या जातील, अशी शंका आहे. जरी निवडणुका झाल्यास मतदार याद्यांमध्ये घोळ नको व्हायला, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ही अपेक्षा व्यक्त करताना, विरोधकांनी भाजप महायुती सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत. म्हणजेच आठ वर्षापूर्वी निवडणुका झाल्या होत्या. यानंतर गेली तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकनियुक्त नसल्याने कारभारात घोळच-घोळ आहे. यात निवडणुका झाल्या तरी मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याची शंका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवक्ते सचिन अहिर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेत लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने सर्व निर्णय एकतर्फी होत असल्याचा आरोप मुंबई (Mumbai) काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, मतदार याद्यांमध्ये घोळ होऊ नये आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर होणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. पारदर्शक आणि लोकशाही मार्गाने निवडणूक झाली तर मुंबईकर योग्य निर्णय घेतील आणि आपले खरे प्रतिनिधी निवडून देतील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

Maharashtra local body elections
Kabutarkhana Issue Mumbai : मुंबईत मराठीविरुद्ध जैन वाद उफाळण्याची चिन्हं; भाजप मंत्र्यांच्या कुबतरखान्यांना, 'आम्ही गिरगावकर' चिकन-मटण सेंटरने उत्तर देणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवक्त सचिन अहिर यांनी, "आमची निवडणुकीला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी आहे. आम्ही सर्व प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना मतदार याद्यांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत." निवडणूक प्रक्रियेवरही बारकाई लक्ष राहणार आहे, असे सचिन अहिर यांनी सांगितले.

Maharashtra local body elections
BJP News : सभापती राम शिंदे यांचा फोटो छापायचा राहिला... कर्जतमध्ये समर्थकांचा थयथयाट

राज्यातील भाजप महायुती सरकारची महापालिका निवडणूक घेण्याची अजूनही मानसिकता दिसत नाही. सत्ताधारी महायुती सरकाराला निवडणुकीबाबत चिंता असल्याने कदाचित त्यांच्याकडून पुन्हा निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न होऊ शकतात, अशी शंका सचिन अहिर यांनी वर्तविली आहे.

मतदार याद्यांमध्ये घोळ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावण करून राज्यातील सरकार आणि निवडणूक आयोगाने निवडणुका घ्याव्यात आणि जनतेवर उपकार करावेत, असा खोचक टोला मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच निवडणूक आयोगाने गेली तीन वर्षे निवडणूक घेतली नाही आणि लोकशाहीत निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, यासारखे दुर्दैव नाही, असेही देशपांडे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com