Mumbai News: अज्ञात व्यक्तीने गेल्या काही दिवसापासून मुंबई उडवून देण्याच्या धमक्या येत आहेत. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा मुंबईला उडवून देण्याची धमकी देण्यात आली. मुंबईच्या मालवणी पोलिसांनी धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक केली आहे.
कॉलरचे नाव नसीमुल रफीउल हसन शेख असे आहे. 'आम्हाला मेन कंट्रोलकडून कॉल आला की एका कॉलरने बीएमसी कंट्रोलवर कॉल केला होता. त्याने मुंबईला उडवून देण्याची धमकी दिली होती.
हा कॉल आल्यानंतर मालवणी पीएसच्या विशेष पथकांनी कॉलरचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने फसवा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमला फोन करुन ही धमकी देण्यात आली होती.
नेमकं काय घडलं..
एका अज्ञात व्यक्तीने मुंबईजवळील (Mumbai News) मीरा रोड पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईत दोन दहशतवादी घुसल्याचे सांगून त्यांचे फोन नंबर दिले.
या धमकीच्या फोननंतर संपूर्ण पोलिस सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावरून शोध घेतला असता त्यातील एक क्रमांक दहिसरचा असल्याचे तपासात लक्षात आले. याची माहिती मीरा भाईंदर पोलिसांनी मुंबई नियंत्रण कक्षाला दिली.
पोलिसांनी तात्काळ दहिसर व गुन्हे शाखेच्या पोलिसांना या व्यक्तींचा शोध घेण्यास सांगितले.पोलिसांनी दोघांपैकी एकाचा शोध घेतला असता, ती महिला असल्याचे उघड झाले. संबधित महिलेसोबतच्या वादातून कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे तिने सांगितले. पण या एका फोनमुळे मीरा-भाईंदर व मुंबई पोलीस दलाची चांगलीच धावपळ झाली.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.