local body controversy : 'केडीएमसी'चा अजब कारभार चर्चेत! मयत कर्मचाऱ्याची बदली, आता विधवेला दोन लाख कराची नोटीस, झोपडी जप्तची तयारी!

KDMC Issues 2.33 Lakh Property Tax Notice to Tribal Widow in Mumbai : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारातील गळथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
KDMC Issues
KDMC IssuesSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवली (KDMC) महापालिकेच्या कारभारातील गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मयत आणि सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा आदेश काढण्याचा प्कार केला होता.

हे प्रकरण ताजे असतानाच, आता टिटवाळ्यातील कातकरी पाड्यात राहणाऱ्या एका आदिवासी विधवा महिलेला तब्बल 2 लाख 33 हजार रुपयांचा मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठवली आहे. ही महिला एका झोपडीत राहते. महापालिकेच्या या कारभारावरून श्रमजीवी संघटनेने तीव्र आक्रमक झाली असून, KDMC प्रशासनाला जाब विचारण्यासाठी लवकरच आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या (Municipal Corporation) मालमत्ता कर वसुली विभागाने ही नोटीस पाठवली असून, ठराविक कालावधीत कर न भरल्यास संबंधित महिलेच्या झोपडीवर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या, झोपडी राहणाऱ्या महिलेला महापालिकेने थेट 2 लाख 33 हजार रुपयांचा मालमत्ता कर आकारण्याची नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या नोटीसमुळे सदर महिला प्रचंड मानसिक तणावाखाली आहे.

कल्याण डोंबिवली (Kalyan Dombiwali) महापालिकेच्या टिटवाळा हा परिसर केडीएमसी हद्दीत येतो आणि प्रभाग क्रमांक एकच्या कार्यालयांतर्गत समाविष्ट आहे. टिटवाळ्यातील गणेश विद्यालयाजवळ असलेल्या कातकरी पाड्यात सुमित्रा बळीराम कातकरी ऊर्फ पारू ही आदिवासी विधवा महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे.

KDMC Issues
Worli hit and run case : मुंबई ‘हिट अँड रन’ प्रकरण; बाप श्रीमंत अन् शिंदे शिवसेनेशी संबंध, मुलाला काही काळ आतच राहू द्या!

सुमित्रा कातकरी ऊर्फ पारू या विधवा असून घरात कमावता पुरुष नाही. तीन मुलांचा उदरनिर्वाह त्या इतरांच्या घरात धुणीभांडी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर चालवतात. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या रकमेचा कर भरणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले. झोपडी विकली तरीही 10 हजार इतकी रक्कम उभी राहणार नाही, अशी हतबल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

KDMC Issues
DK Shivakumar CM claim : शिवकुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? आमदारानं तारीख सांगितल्याने खळबळ

महापालिकेने पाठविलेल्या या नोटीसमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आधीच गोंधळलेल्या निर्णयांमुळे चर्चेत असलेल्या केडीएमसीने आता एका गरीब आदिवासी विधवा महिलेवर कराचा बोजा टाकून अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आणल्याची टीका होत आहे.

या प्रकरणाचा श्रमजीवी संघटनेने तीव्र निषेध केला असून, केडीएमसी प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित आदिवासी महिलेच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहणार असल्याचेही श्रमजीवी संघटनेने जाहीर केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com