चोवीस तास ईडी-सीबीआय हटवा, मग आम्हीही...! पेडणेकरांचं राणेंना आव्हान

नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत २४ तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो, अशी घणाघाती टीका केली होती.
kishori pednekar
kishori pednekar Sarkarnama

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ताफ्यावर रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत २४ तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो, अशी घणाघाती टीका केली होती. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर (kishori Pednekar) यांनी राणेंना आव्हान दिलं आहे.

सोमवारी माध्यमांशी बोलताना पेडणेकर म्हणाल्या, तुम्हीही ईडी आणि सीबीआय चोवीस तास हटवा, मग आम्ही दाखवून देऊ. आम्ही लोकशाही मार्गाने काम करत आहोत. यापुढेही त्याच मार्गाने काम करू. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सकडून लोकांवर कारवाई केली जाते. पण जेव्हा ते भाजपमध्ये जातात तेव्हा तेच लोक स्वच्छ प्रतिमेचे होतात, अशी टीकाही पेडणेकर यांनी केंद्रीय यंत्रणांच्या छापेमारीवरून भाजपवर केली.

kishori pednekar
फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर रशियानं घेतला मोठा निर्णय; भारतीयांनाही मिळणार दिलासा

मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने आता प्रशासक काम पाहणार आहेत. अद्याप निवडणूक जाहीर झाली नसल्याने सध्याची पालिका बरखास्त होणार आहे. पण मुंबईत शिवसेनेचीच सत्ता येईल, असा विश्वास पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईकर शिवसेनेच्या पाठिशी आहेत आणि यापुढेही साथ देतील, असे पेडणेकर म्हणाल्या. भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर त्यांचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो. मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावे. यानंतर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाही. २४ तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो, अशी घणाघाती टीका राणे यांनी रविवारी केली होती.

kishori pednekar
महाजन मागे हटले नाहीत! न्यायालयाच्या आदेशानुसार दहा लाख रुपये केले जमा

शनिवारी नारायण राणे आणि नितेश राणे यांची पोलिसांनी तब्बल ९ तास चौकशी केली. त्यावर विचारले असता राणे म्हणाले, कालच्या ९ तासाच्या चौकशीमध्ये आमच्याकडे काय पुरावे आहेत. हे पुरावे मुंबई पोलिसांना मिळावे यासाठी प्रयत्न केले गेले. दिशांच्या हत्येवेळी महाराष्ट्रातील एक मंत्री जुहु मध्ये होता, असे ते पुन्हा म्हणाले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशांच्या आईवडीलांना धमकावले त्यामुळे त्या बिचाऱ्या लोकांनी आमच्या विरोधात तक्रार दाखल केली, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत, असेही असेही राणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com