शाळा सुरु करण्यास मुंबई महापालिका अनुकूल, पण टास्क फोर्स म्हणते...

कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत
शाळा सुरु करण्यास मुंबई महापालिका अनुकूल, पण टास्क फोर्स म्हणते...
Published on
Updated on

मुंबई : राज्यात कोरोना (Covid 19) संसर्गाची लाट ओसरत असताना आता राज्यभरात शाळा (Schools) सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात ८ ते १२ वीच्या शाळा सुरु झाल्या असल्या तरी अद्याप १ ली ते ७ चे वर्ग बंद आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि कोरोना कृती दलाच्या मान्यतेनंतर शाळेबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासनही मुंबईत शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक आहे. त्यानुसार, मुंबईत १ ली ते ८ वी वर्ग सुरु करण्यासाठी मुंबई महापालिकेनेही तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर शाळा सुरु झाल्यानंतर कोविडचा संसर्ग वाढलाच तर त्यावर मात करण्यासाठीही प्रशासन पूर्ण सक्षम असल्याचं महापालिकेने म्हटले आहे.

शाळा सुरु करण्यास मुंबई महापालिका अनुकूल, पण टास्क फोर्स म्हणते...
सातारा जिल्हा बँक निवडणूकीत शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का

मात्र कोविड टास्क फोर्सने आधी मुलांचे लसीकरण करा आणि मग शाळा सुरु करा, असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. गेल्या वर्षभरापासून लहान मुले शाळेत गेलेली नाही. त्यामुळे आधी मुलांचे लसीकरण करा आणि मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे मार्च २०२०मध्ये शाळा बंद झाल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शाळा बंद होत्या. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हळहळू शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. ४ ऑक्टोबरपासून राज्यभरातील ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे, तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत.

त्यामुळे आता पालकांकडून इयत्ता पहिली ते चौथीचेही वर्ग सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचसोबतच पूर्व प्राथमिकच्या वर्गांतील विद्यार्थीही शाळेत जातील, कोरोनामुळे गेले दीड वर्ष ऑनलाईन शिक्षणात गुंतून पडलेली मुलांसाठीही प्रत्यक्ष वर्ग सुरू होणे महत्त्वाचे आहे, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com