मनसेची "ती' धडधडणारी तोफ गेली कुठे ? 

वृत्तपत्र असो वा वृत्तवाहिनी, जाहीर सभा असो वा पक्षाची बैठक... "मनसे'ची एक तोफ जिथे तिथे धडधडताना दिसायची. धारदार आवाज, दांडगा अभ्यास, समोरच्याला उघडे पाडण्याचे जबरदस्त कौशल्य असा दैवी गुण लाभलेले हे व्यक्तिमत्व. राज ठाकरे यांचा जवळचा सवंगडी. पण हा सवंगडी गेला कुठे ? चार - पाच वर्षांपासून तो आता मनसेमध्ये दिसत नाही. दुसऱ्या पक्षातही उडी मारलेली नाही. राज यांच्या या जवळच्या संवगड्याचे नाव "शिरीष पारकर' !
मनसेची "ती' धडधडणारी तोफ गेली कुठे ? 
Published on
Updated on

मुंबई : वृत्तपत्र असो वा वृत्तवाहिनी, जाहीर सभा असो वा पक्षाची बैठक... "मनसे'ची एक तोफ जिथे तिथे धडधडताना दिसायची. धारदार आवाज, दांडगा अभ्यास, समोरच्याला उघडे पाडण्याचे जबरदस्त कौशल्य असा दैवी गुण लाभलेले हे व्यक्तिमत्व. राज ठाकरे यांचा जवळचा सवंगडी. पण हा सवंगडी गेला कुठे ? चार - पाच वर्षांपासून तो आता मनसेमध्ये दिसत नाही. दुसऱ्या पक्षातही उडी मारलेली नाही. राज यांच्या या जवळच्या संवगड्याचे नाव "शिरीष पारकर' !
 
मनसेध्ये "सरचिटणीस' या उच्च पदावर पारकर काम करायचे. साधारण गेल्या पाच वर्षापासून ते मनसेतून गायब आहेत. गंमत म्हणजे, ते पक्षात कार्यरत नसले तरी त्यांना अजून पदावरून दूर केलेले नाही. पारकर यांच्याकडूनही राजीनामा आलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पारकर अद्यापही पदावर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राम कदम, प्रवीण दरेकर, वसंत गिते यांच्यासारखे मनसेतील अनेक मातब्बर मंडळी पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. काहीजण शिवसेनेत गेले. पारकर यांनी मात्र दुसऱ्या कोणत्याच पक्षात अद्याप उडी मारलेली नाही. त्यांना राजकारणाचाच कंटाळा आल्याचे बोलले जात आहे.
 
मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या अगदी निकटच्या वर्तुळात पारकर कार्यरत होते. त्यांची मते रोखठोक असायची. पक्षाच्या बैठकीत अनेकांना त्यांची ही मते पटायची नाहीत. पारकर यांचा दांडगा अभ्यास होता. त्यामुळे त्यांची मते अभ्यासपूर्ण असायची. शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ते महाराष्ट्रातील आधुनिक राजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास होता. दुरचित्रवाणीवरील चर्चांमध्ये ते हिरीरिने सहभागी व्हायचे. या चर्चांमध्ये समोरच्या वक्‍त्याला ते नेहमी उघडे पाडायचे. त्यामुळे चर्चासत्रांत विरोधक त्यांना वचकून असायचे.
 
पारकर सध्या काय करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क साधला असता, मी मनसेमध्ये अनेक वर्षांपासून सक्रीय नाही. माझा एक व्यवसाय सुरू केला असून त्या व्यवसायात मी रमलो आहे, असे त्यांनी सांगितले. मनसेची "ती' धडधडणारी तोफ गेली कुठे ? 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com