Mumbai North East Lok Sabha Election Result Live : मुंबई उत्तर पूर्व ठाकरेंचीच? संजय दिना पाटील - मिहिर कोटेचा यांच्यात काँटे की टक्कर

Sanjay Dina Patil Vs Mihir Kotecha : मुंबईतील एकएक जागा जिंकून ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी फडणवीसांनी प्रचंड उठाठेवी केल्या. ठाकरेंच्या शिलेदारांविरोधात एकास एक उमेदवार देण्याची चाल खेळली.
Mihir Kotecha, Sanjay Dina Patil
Mihir Kotecha, Sanjay Dina PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर पूर्व मध्ये भाजप अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे अशीच लढत होत आहे. हा मतदारसंघ सर करण्यासाठी सुरू असलेल्या लढाईत ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी सरशी घेतल्याचे दिसून येत आहे.

मात्र भाजपचे मिहिर कोटेचा फक्त २४ हजार मतांनी पिछाडीवर असल्याने येथे काँटे की टक्कर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच वरचढ ठरलेला ठाकरे गट हा मतदारसंघ राखणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील एकएक जागा जिंकून ठाकरेंना नामोहरम करण्यासाठी फडणवीसांनी प्रचंड उठाठेवी केल्या. ठाकरेंनी जिथे कुठे ताकदवान मात्र निष्ठेच्या बळावर साथीदार उतरवले त्याच मतदारसंघात फडणवीसांनी 'नहले पे दहीला' टाकला आणि एकास एक उमेदवार देण्याची चाल खेळली. त्यातूनच ठाकरेंच्या माजी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात मिहीर कोटेचा यांना उतरवले.

पाटलांना आपण सहज गुंडाळू, अशी अटकळ बांधून फडणवीसांनी कोटेचांना प्रचंड रसद पुरवली. मात्र ठाकरेंनी गनिमी कावा करीत कोटेचांना गाठले. ठाकरेंनी कोटेचा यांना नव्हे तर फडणवीसांचाच पराभव करण्यासाठी पाटलांना सेफ केले. त्याचा परिणाम दिसून आले. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीत ठाकरेंचे शिलेदार संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

संजय दिना पाटील यांना 3 लाख 60 हजार 255 मते तर भाजपचे मिहिर कोटेचा 3 लाख 35 हजार 328 मते मिळालेली आहेत. पाटलांनी फक्त 24 हजार 927 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप किरीट सोमय्या (2014), मनोज कोटक (2019) यांच्या विजयानंतर आता हॅटट्रीक करणार की, हा मतदारसंघ भाजपकडून खेचण्यात ठाकरेंना यश मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com