Ravindra Waikar Win : मुंबईत मोठा ट्विस्ट! रवींद्र वायकरांचं नशीब फळफळलं

Mumbai North West Lok Sabha Election 2024 : इच्छा नसतानाही वायकरांना निवडणूक लढवावी लागली होती. आता आलटून पालटून मताधिक्य घेताना झालेल्या अटीतटीच्या लढतीत वायकर शेवटच्या टप्प्यात फक्त 48 मतांनी विजयी झाले.
Amol Kitikar, Ravindra Waikar
Amol Kitikar, Ravindra WaikarSarkarnama

Mumbai Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ED ग्रस्त असलेले ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाकडून रवींद्र वायकर निडणुकीच्या मैदानात होते. त्यांच्यातील लढत अटीतटीची झाली. कधी कीर्तीकर तर कधी वायकरांना मताधिक्य मिळत असल्याने दोन्ही गटाची धडधड वाढत होती. या लढत वायकरांनी फक्त 48 मतांनी आपल्या खिशात घातली आहे.

शिवसेना फुटल्यानंतर सिटिंग खासदार गजानन कीर्तीकरांनी शिंदे गटाची वाट धरली. मात्र त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांना लोकसभेच्या तिकीट देऊन ठाकरेंनी निष्ठेचे फळ दिले. त्यांच्याविरोधात मात्र महायुतीला उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळे रवींद्र वायकारांना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याकडे खेचले. त्यानंतर त्यांनी वायकरांच्या अंगाला लोकसभेच्या आखाड्याची माती लावली.

इच्छा नसतानाही वायकरांना अमोल कीर्तीकरांविरोधात लोकसभेची निवडणूक लढवाली लागली. तसे त्यांनी काहीवेळी जाहीरपणे सांगितलेही. आता मात्र त्यांचे नशीब फळफळल्याचे दिसून येत आहे. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पहिल्यांदा वायकर लीडवर होते. त्यानंतर अमोल कीर्तीकरांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या टप्प्यापर्यंत होती.

Ravindra Waikar, Amol Kirtikar Voting
Ravindra Waikar, Amol Kirtikar VotingSarkarnama

शेवटच्या टप्प्यातील काही वेळात वायरांनी अचनाकच कीर्तीकरांचे अडीच हजारांचे लीट तोडत सरशी घेतली. सायंकाळी पावणे आठपर्यंत वायकरांनी 447159 मते मिळवली होती. तर कीर्तीकरांना 446648 मिळाली होती. वायकर 511 मतांनी लिडवर होते. यावर कीर्तीकरांनी आक्षेप घेत पुन्हा मतमोजणीची मागणी केली होती. त्यानंतर रात्री उशीरा वायकरांनी 452644 मते घेतली. तर कीर्तीकरांना 452596 मिळाली. फेऱ्या संपताच निवडणूक आयोगाने वायकरांना 48 मतांनी विजयी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com