मुंबई : कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराकडे १०० कोटींची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. (Eknath Shinde ministry updates) या टोळीने तीन- ते चार आमदारांना गळाला लावल्याची माहिती असून त्यातील एक पुणे जिल्ह्यातील आमदार असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.
राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार सध्या 'नंदनवन' आणि 'सागर' या शासकिय बंगल्याकडे लक्ष ठेवून आहेत.
नेमक्या याच संधीचा फायदा घेत चारही आरोपींनी आमदारांना गाठून त्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
आरोपींनी आमदारांना विश्वास बसावा म्हणून फोनवर दिल्लीतून आलो असल्याचे सांगत, मंत्री महोदय यांनी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर दोन तीन वेळा आमदारांना दूरध्वनी करून मी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्री मंडळात मंत्रीपद देण्यासाठी १०० कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली.
मंत्रीमंडळात सहभागासाठी नंतर ९० कोटी रुपये मागत असून त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १८ कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे आमदारांना सांगितले.
आरोपीने सोमवारी नरिमन पॉईंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले.
याची कुणकुण पोलिसांना असल्याने साध्यावेशात असलेल्या पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्याच्या चौकशीतून इतर तीन आरोपीची नावे समोर आली
एका आमदाराच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.