पमरवीर सिंहांना फरार गुन्हेगार घोषित करा : मुंबई पोलिसांची मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडे धाव

न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या विरोधात तीन अजामीनपात्र वारंट जारी केली आहेत.
 Param Bir Singh
Param Bir Singhsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढणार होणार आहे. खंडणीच्या प्रकरणात परमवीर सिंह आणि इतर दोघांना ‘फरार गुन्हेगार’ घोषित करण्यात यावे, अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली आहे. तसा अर्ज त्यांनी शनिवारी (ता. १३ नोव्हेंबर) मुंबईतील मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात दाखल केला आहे. (Mumbai Police demands to declare Parmveer Singh a Fugitive criminals)

बिमल अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात सचिन वाझे याचा मुख्य रोल असल्यामुळे गुन्हे शाखेने त्याचा ताबा एनआयएकडून घेतला आहे. नुकतीच न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या विरोधात तीन अजामीनपात्र वारंट जारी केली आहेत. परमबीर सिंह हे गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत, ते देशाबाहेर गेल्याची चर्चा आहे. गेल्या ३ महिन्यांपासून परमवीर सिंह त्यांच्या कुटुंबीयांसह अधिकारी तेथे राहत नाहीत. त्यांनी असे सिंह यांच्या घराचे सुरक्षा रक्षक सतीश बुरुटे आणि स्वयंपाकी रामबादूर कुलबहादूर थापा यांनी गुन्हे शाखेला माहिती दिली. त्यांना सिंह आणि कुटुंबाच्या ठावठिकाणाबद्दल कल्पना नाही आणि त्यांच्याशी कोणताही संवाद झालेला नाही.

 Param Bir Singh
कोरे, आवाडे गटाचे मतदार विरोधकांच्या हाती लागू नयेत यासाठी महाडिकांनी आखली विशेष रणनीती !

विनय सिंगच्या बाबतीत, टीमने त्याचा भाऊ आणि पत्नीची भेट घेतली. ज्यांनी सांगितले की गुन्हा दाखल झाल्यापासून विनय सिंग हा घरी आलेला नाही. तसेच, त्याच्या फोनद्वारे किंवा इतर कोणत्याही संभाषणाद्वारे त्याच्या संपर्कात नाही. अधिकाऱ्यांनी त्याच्या मोबाईल लोकेशवरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना त्याचा शोध लागला नाही.

 Param Bir Singh
राज्यमंत्री यड्रावकर आमच्यासोबतच; त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत

अर्जात म्हटले आहे की, अनेक अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही, तीन आरोपी बेपत्ता राहिले आहेत. त्यानुसार तीन आरोपींना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 82 नुसार ‘फरार’ घोषित करण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. एकदा न्यायालयाने ‘फरार’ घोषित केल्यावर, प्रमुख ठिकाणी नोटीस प्रदर्शित केल्या जातील की आरोपी ‘वॉन्टेड’ आहेत आणि त्यांनी ताबडतोब न्यायालयात यावे. तीस दिवस उलटून गेल्यानंतर, कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, मुंबई पोलिस सीआरपीसीच्या कलम 83 अंतर्गत अर्ज दाखल करू शकते. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयात हा अर्ज केला आहे. न्यायालयाचा आदेश आले की, घोषित गुन्हेगारांच्या मालकीची जंगम मालमत्ता जप्त करता येऊ शकते.

दरम्यान, याच प्रकरणात वाझे हा सध्या 15 नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये न्यायदंडाधिकार्‍यांकडे जबाब नोंदवण्याचा विचार करत असल्याचे वाझे यांनी आज न्यायालयाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com