मुंबई पोलीस ईडीला आणणार जेरीस? नवलानीसह इतर कंपन्यांविरूध्द कारवाई सुरू

शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालवयावर (ED) अनेक गंभीर आरोप केले होते.
ED vs Mumbai Police
ED vs Mumbai PoliceSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयावर (ED) अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी आणि ईडी यांच्या विरोधात तक्रारीत नाव असलेल्या कंपन्यांविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस विरूध्द ईडी असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवलानी हा ईडीचा एजंट असल्याचा गंभीर आरोप केला होता. अनेक कंपन्यांकडून वसूल करण्यात आलेले पैसे नवलानीच्या कंपनीच्या खात्यात जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीसांकडे केली होती. त्यानुसार आता ठाकरे सरकारने या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाईला सुरूवात करण्यात आली असून संबंधितांना समन्सही बजावण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत दोघांचे जबाब घेतल्याचेही समजते.

ED vs Mumbai Police
अण्वस्त्रांचा वापर कधी करणार? रशियानं थेट सांगितलं अन् जगाला दिला इशारा

ज्या कंपन्यांच्या नावासमोर पैसे आले आहेत, त्यांचे माध्यम कोणते आहे, आणि ते कसे आले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, नवलानी याच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंनीही ७ कोटी रुपये दिले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले होते.

भोसले यांच्यासह DHFL घोटाळ्यातही नवलानी याचा संबंध आहे. या कंपनीकडून नवलानी याच्या खात्यात 25 कोटी खात्यावर जमा, वाधवानकडून दहा कोटी आणि अविनाश भोसलेंच्या कंपन्याकडून सात कोटी रुपये जमा झाला आहे, असे राऊत यांनी सांगितले. जीतेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कसे दिले जातात, असा सवाल राऊत यांनी केला आहे होता. नवलानी आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा काय संबंध आहे हे मी लवकर सांगणार आहे, असा ईशाराही राऊत यांनी दिली होता. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार. माझे शब्द लिहून ठेवा, असेही राऊत यांनी सांगितले होते.

ED vs Mumbai Police
जितेंद्र आव्हाडांना ईडीचा धसका ; म्हणाले, ''मी आत्महत्या करेल,''

ईडीचा सारा पैसा विदेशात चालला आहे. यात वसुलीत भाजपचे नेते देखील सहभागी आहेत. याची सारी माहिती मी देणार आहे. त्याची अधिकृत तक्रार मी दाखल केली आहे. मी हे सारे कागदावर बोलतो आहे. आता आमच्या महाराष्ट्र पोलिसांकडे याची कागदपत्रे दिली आहेत. महात्मा किरीट सोमय्या हे आमच्याविरोधात कागद फडकवतात. ती पीएमसी बॅंक घोटाळा, डीएचएफल याच्याबद्दल ते आम्हाला प्रश्न विचारतात. मात्र, डीचएफएलच्या वाधवान सोबत सोमय्या यांचे काय संबंध आहेत, हे मी विचारले होते, असेही राऊत म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com