NCP News : महापालिका निवडणुकीतील पराभव जीवावर उठला; मुंब्र्यात राष्ट्रवादीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; परिसरात तणावाचे वातावरण

Mumbra stabbing incident latest news : मुंब्रामध्ये अजित पवारांच्या खंद्या नेत्यावर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला झाला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Ajit Pawar minister dissatisfaction
Ajit Pawar minister dissatisfactionSarkarnama
Published on
Updated on

Thane Politics : राज्यात 29 महापालिकांमधील महापौर पदासाठी राजकीय चढाओढ सुरू असतानाच मुंब्र्यातून एक धक्कादायक आणि तणावपूर्ण घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे मुंब्र्यात राजकीय वातावरण अधिकच तापले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंब्रा येथील सम्राट नगर परिसरात प्रभाग क्रमांक 31 मधील अजित पवार गटाच्या उमेदवार मनीषा प्रवीण पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यावर विरोधकांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. काल रात्री उशिरा ही घटना घडली असून हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Ajit Pawar minister dissatisfaction
Professor And Gangster Murder : मुंबई रक्तरंजित! प्राध्यापकानंतर कुख्यात गुंडाचा काटा, शंकरवर 29 वार, थरकाप उडवणारा खून!

नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आमनेसामने उभे राहिले होते. अजित पवार गटाकडून मनीषा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर शरद पवार गटाकडून पल्लवी शिवा जगताप या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र या निवडणुकीत मनीषा पवार यांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर दोन्ही गटांमध्ये तणाव वाढल्याचे चित्र दिसत होते.

निवडणुकीतील निकालानंतर प्रवीण पवार आणि शिवा जगताप यांच्यात अनेकदा वाद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून काल रात्री हा हल्ला झाल्याचा आरोप प्रवीण पवार यांनी केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिवा जगताप यांचे भाऊ अप्पा जगताप यांनी प्रवीण पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात प्रवीण पवार यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ajit Pawar minister dissatisfaction
Naxalism Gadchiroli : रणांगणात गडचिरोलीचा दबदबा! शौर्यपदकांवर जवानांची मोहोर

मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे सम्राट नगरसह संपूर्ण मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. राजकीय वादातून हिंसाचार घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या हल्ल्यामुळे मुंब्र्यातील राजकारण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com