Ruta Awhad:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्ह्याध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे; नव्या वादाला तोंड फुटलं

Jitendra Awad Wife Ruta Awhad Controversial statement: वादग्रस्त विधान केल्यामुळे अनेक वेळा जितेंद्र आव्हाड अडचणीत आल्याचे वृत्त आपण वाचले आहे, आता त्यांच्या पत्नीनेही वादग्रस्त विधान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Jitendra Awad Wife Ruta Awhad  Controversial statement
Jitendra Awad Wife Ruta Awhad Controversial statementSarkarnama
Published on
Updated on

Mumbra:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड (ruta awhad) यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहे. त्यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

"तुम्हीही 'ओसामा बिन लादेन' यांचे जीवन वाचा आणि ओसामा बिन लादेन कसा बनला याचा धडा त्यांच्याकडून घ्या,'असा अजब सल्ला ऋता आव्हाड यांनी उपस्थित महिलांना दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Ruta Awhad Controversial statement)

मुंब्य्रातील नूरबाग हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून मुंब्य्रातील महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात अभिनेत्री स्वरा भास्कर,ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ऋता आव्हाड उपस्थित होत्या.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांच्यासमोरच त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. वादग्रस्त विधान केल्यामुळे अनेक वेळा जितेंद्र आव्हाड अडचणीत आल्याचे वृत्त आपण वाचले आहे, आता त्यांच्या पत्नीनेही वादग्रस्त विधान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Jitendra Awad Wife Ruta Awhad  Controversial statement
Mumbai University Senate Election Result: युवासेना की अभाविप? मुंबई विद्यापीठात कोण मारणार बाजी, मतमोजणी सुरु

"ओसामा बिन लादेन याला समाजाने दहशतवादी बनण्यास भाग पाडले होते. ओसामा बिन लादेन हा जन्माने दहशतवादी नव्हता, त्याला परिस्थितीने दहशतवादी बनण्यास भाग पाडले होते. त्यामुळे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून नाही तर पुस्तकातून ज्ञान मिळवा," असा सल्ला ऋता आव्हाड यांनी महिलांना दिला आहे.

त्यांच्या या विधानावर सोशल मीडियामध्ये नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरवात केली आहे. यावर अद्याप जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com