पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray)यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेलं वक्तव्य मनसेच्या अंगलट येत आहे. मनसेच्या (mns)पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.
पुण्यातील मनसे शाखाअध्यक्ष माजीद शेख, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी, शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राजीनामा सत्र हे राज्यभर सुरु झाले असल्याचे चित्र आहे.
मशिदीवरील अनाधिकृत भोंगे काढण्याबाबत राज्यात मनसे (mns)'खळखट्याक' करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुस्लिम समाजाने राज ठाकरे यांचा निषेध केला आहे. भोगे उतविण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला ३ मे ही मुदत दिली आहे. पण त्या अगोदर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरवात केली आहे.
मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख (Irfan Shaikh) यांनी काल (गुरुवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
''खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा 'जय महाराष्ट्र' म्हणण्याची वेळ आली आहे,'' असे शेख यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभेत बोलत असताना आपल्यावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. '3 तारखेपर्यंत ऐकलं नाही तर देशामध्ये जिथे-जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. यानंतर माझ्यासह आम्ही सगळे अंगावर केसेस घेण्यासाठी तयार आहोत' असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला एक प्रकारे इशाराच दिला आहे.
ठाकरे म्हणाले, ''जर सांगून तुम्हाला समजत नसेल की, भोंगे खाली उतरवा.. तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार..''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.