Nana Patole: अजितदादांच्या प्रश्‍नावर पटोलेंचे उत्तर; म्हणाले, मी तर जयंत पाटलांशी बोललो !

Nana Patole on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Nana Patole On Mahavikasaghadi :  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बद्दल नाराजी व्यक्त केली आहे. थेट प्रसार माध्यमांशी न बोलता आधी महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांसोबत बोलायला पाहिजे होत. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. महाविकास आघाडीच्या सभेत आपण हा मुद्दा मांडणार आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

 यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.महाविकास आघाडीमध्ये खरंच मतभेद आहेत का? तिन्ही पक्षात दुरावा वाढलाय का? यासंदर्भात थेट महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधला.

Nana Patole
Supriya Sule News : अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; आत्ता उन आहे : पण...

महाविकास आघाडी मतमतांतरावर बोलताना नाना पटोले म्हणाले, "मुद्दाम अशा प्रकारच्या चर्चा रंगवल्या जातात. सत्ताधारी पक्षाच्यावतीने असा खेळ खेळला जातो. कारण हे सरकार फेल झालेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा अवकाळी पाऊस असो, अशा सर्व विषयांमध्ये हे सरकार फेल झालं आहे."

"महागाई बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सर्वांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपा अशी रणनीती खेळते आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतमतांतर नाहीत, महाविकास आघाडी एकत्र आहे असे त्यांनी स्पष्ट केले".

Nana Patole
Konkan politics :कोकणात पुन्हा संघर्ष; ठाकरे- शिंदे गटात बाचाबाची; संजय कदमांचा अधिकाऱ्यांवर संताप

अजित पवार यांच्या बद्दल बोलतांना पटोले म्हणाले, "अजित पवार यांनी काय म्हणावे मला माहित नाही. मी जयंत पाटील यांना सांगितले होते. ते अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसोबत एकत्र आहेत आणि भाजप विरोधात लढायचे म्हणून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे खालच्या पातळीवर देखील एकजूट असली पाहिजे. कार्यकर्त्यांमध्ये मनोधैर्य वाढलं पाहिजे.आज बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणी ही स्थिती निर्माण झाली. ही गोष्ट अनेक वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सांगितली आहे. ही गोष्ट दादांना कदाचित माहित नसेल. पण जेव्हा भाजपशी लढायचे असेल तेव्हा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट असली पाहिजे."

पटोले म्हणाले, "मूळ प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे भेटले तर ती बातमी होऊ शकत नाही. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण सरकार उदासीन आहे. या सरकारच्या अनास्थेची चर्चा होणे गरजेचे आहे. पण आम्ही भेटलो तर चर्चा आणि नाही भेटलो तरीही चर्चा ही बातमी होऊ शकत नाही.

दरम्यान, आज 'जेपीसी' का गरजेचा आहे हे लोकांना कळले पाहिजे.कारण आपण पाहिलं असेल की राजीव गांधी यांच्यावर जेव्हा बोफोर्स बद्दल आरोप झाले, तेव्हा राजीव गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन 'जेपीसी' बसवली आणि दूध का दूध पाणी का पाणी केले. जेपीसी ही खासदारांची असते. स्वतः शरद पवार हे 2003 मध्ये जेपीसीचे अध्यक्ष होते. जेपीसी हे काही नवीन नाही.

(Edited By : Rashmi Mane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com