मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर केवळ हिंदूह्दयसम्राट एवढं न लावता शिवसेनाप्रमुख हे लावले पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरे हे फक्त हिंदूचे नेते नव्हते, तर सर्व जातीधर्माचे नेते होते, अशी सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात केली.
मुंबईतील विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर केवळ हिंदूह्दयसम्राट असे लावण्यात येऊ नये. ठाकरे यांच्या नावासमोर शिवसेनाप्रमुख असेही असावे अशी सूचना केली.
अजित पवार म्हणाले की, शिवसेनाप्रमुख पदाशिवाय बाळासाहेब ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला अपूर्ण आहे. त्यामुळे हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव प्रतिमेवर लिहिलेले आहे. त्याऐवजी शिवसेनाप्रमुख, हिंदूहदयसम्राट असे करावे, अशी माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उसभापतींना विनंती आहे.
अजित पवार यांच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी पवारांच्या सूचनेवर कडक शब्दांत समाचार घेतला. राणे म्हणाले की, मी आता अजित पवार यांचे भाषण ऐकले. त्यांनी अत्यंत चांगले भाषण केले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे काय विशेषणं लावायची यावर बोलण्याच्या अधिकार बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात असणाऱ्यांना आहे. त्यांनी बोलावे, असे सांगून राणे यांनी अजित पवार यांची सूचना कार्यक्रमातच हाणून पाडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.