नाटकी, कपटी, दृष्ट, खोटारडे, विश्वासघातकी, शेंबड्या : ठाकरेंसाठी राणेंचा शिव्यांचा खजिना!

Uddhav Thackeray यांच्या मुलाखतीवर जोरदार प्रहार
Narayan Rane, Uddhav Thackeray
Narayan Rane, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अनेक अपशब्द वापरले. महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खाते हे आदित्य आणि रश्मी ठाकरे याच चालवत होत्या, असा खळबळजनक आरोप त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी आज दिलेल्या मुलाखतीवर राणे यांनी जोरदार प्रहार केला. आपण फार सोशिक असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ठाकरे यांनी केल्याचा आरोप राणे यांनी केला. उद्धव कसे आहेत, हे मला चांगले माहीत आहे. मी 34 वर्षे शिवसेनेत घालवली आहेत. त्यामुळे ठाकरेंचा नाटकीपणा मला माहीत आहेत. दृष्ट, कपटी स्वभावाचे ठाकरे हे केवळ आपल्या आजारपणाचे भांडवल करण्याचा प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ठाकरे यांना हिंदुत्व आठवले आहे. हिंदुत्वावर बोलताना लाज वाटली पाहिजे, अशी टीका राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी जे दिलं नाही ते प्रेम एकनाथ शिंदे यांनी आमदारांना दिले. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने आमदार त्यांच्यासोबत गेले. मुख्यमंत्री असताना ठाकरे कधी आमदारांना भेटत नव्हते. आता आमदारांच्या नावाने गळे काढत आहेत, असे राणे यांनी शरसंधान केले.

ठाकरे यांची मुलाखत बोगस होती. फक्त सबबी सांगून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न होता. संजय राऊत यांच्यासारख्या जोकर माणसाने ठाकरे यांची मुलाखत घेतली. ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद घालवले आणि त्यांचीच मुलाखत घेताना राऊत यांना लाज कशी वाटल नाही, असा खोचक सवाल राणेंनी केला.

मला मुख्यमंत्रीपदाची हवा नाही असे म्हणता मग वर्षा बंगला सोडताना दुःख का झालं, असाही सवाल राणेंनी केला.

Narayan Rane, Uddhav Thackeray
पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नव्हे... उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे नाही, असे सांगितले आहे. त्याचाही समाचार राणे यांनी घेतला. बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला वडिलांसमान होते. त्यांना अंडरवर्ल्डची धमकी मिळाली तेव्हा त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही होतो. तेव्हा तू कुठे होतास रे शेंबड्या? घरातून दोन वेळा बाहेर पळून गेला होता. हे आता त्याला आठवणार नाही. बाळासाहेबांचे नाव घेणे आमचा अधिकार आहे. त्यापासून आम्हाला कोणी रोखणार नाही. नेहरू, टिळक, आंबेडकर यांचे नाव घेण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यकता नाही, असेही राणेंनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com