'' अडीच वर्षात तुम्ही किती चोरी केली ?'' नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

कोरोना काळात उध्दव ठाकरे यांनी फक्त फक्त पैसे खाण्याचे काम केले.
Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane Latest News : उध्दव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.यावेळी त्यांनी भाजप हा चोर पक्ष झाला आहे अशी टीका देखील केली होती.आता यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणेंनी उध्दव ठाकरेंवर सडकून टीका केली.

राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं बुलढाण्यातील भाषण माझ्याकडे आहे. म्हणे, भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार? आता चोर म्हणत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष संसार केला ना? अनेक वर्ष सोबत होते ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव वापरुन मोठे झालात ना, भाजपचा हात धरुन सत्तेत आलात ना, आणि नंतर शरद पवारांसोबत अडीच वर्ष होते ना? तेव्हा नाही वाटले चोर? असे सवालही राणे यांनी उपस्थित करत ठाकरेंवर हल्लाबोल केला. तुम्ही अडीच वर्षात किती चोरी केली ते जरा सांगा असेही ठाकरे म्हणाले.

Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
मोठी बातमी ! शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार: ठाकरे- आंबेडकरांची युतीची घोषणा

मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षांच्या काळात कितीदा मंत्रालयात गेले असा सवाल करत ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात गेले. उध्दव ठाकरे आणि प्रशासन जमत नाही, उध्दव ठाकरे आणि आंदोलनं जमत नाही असा आरोप देखील राणे यांनी यावेळी केला. त्यांचं शिवसेनेत काही योगदान नाही. ठाकरे कधीही आंदोलनात गेले नाहीत असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

कोरोना काळात उध्दव ठाकरे हे मातोश्रीच्या पिंजर्यात गप्प बसून राहिले. त्या कालावधीत ठाकरेंनी फक्त पैसे खाण्याचे काम केले. कधी त्यांनी कुणा कार्यकर्त्याचं घर बसवलंय की कुणा गोरगरीबाला मदत केली अशा शब्दांत राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Narayan Rane, Uddhav Thackeray Latest News
Police Recruitment : पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

हिंदू हा शब्द देखील उध्दव ठाकरेंनी उच्चारु नये. त्यांनी सावरकर, हिंदुत्वाबद्दल काय भूमिका घेतली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी ज्यावेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांनी सावरकरांवर टीका केली. पण त्यावर ठाकरे काहीही बोलले नाहीत. मात्र, आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींना जाऊन मिठी मारली. यावेळी आदित्य ठाकरे काय बोलले माहीत नाही असेही राणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com