Narendra Modi Vs Congress : गरिबी, गरिबी, गरिबी...; मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस, स्वातंत्र्यापासून इतिहासच काढला!

Lok Sabha Election 2024 : भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी अनेक देश स्वतंत्र झाले. मात्र ते पुढे गेले आणि आपण मागे राहिलो. त्याला कारणीभूत काँग्रेसचे सरकार आहे. लाल किल्ल्यावरून काही पंतप्रधानांनी आपल्या भारतीय नागरिकांना आळशी म्हणून संबोधले.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Maharashtra Political News : भारतासह जगातील अनेक देश 1947 मध्ये स्वातंत्र्य झाले, मात्र त्या देशांची आज मोठी प्रगती झाली आहे. मात्र आपला देश विकासासाठी झगडतच राहिला. सत्तेत असलेली काँग्रेस 60 वर्षे गरिबी हटवण्याची भाषा करत होती.

प्रत्येकी निवडणुकीत ते गरीब, गरीब, गरीब, गरीब, गरीब... असा जप करत होते. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत होते. लोकांना गरिबीतच दिवस काढावे लागणार, असेच ते बिंबवत होते. आता दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. ज्या गोष्टी काँग्रेसला अशक्य वाटत होत्या, त्या सर्व बाबी शक्य करून दाखवल्या, असा सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. Narendra Modi Vs Congress

राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली. यावेळी मोदींनी स्वातंत्र्यापासून इतिहास काढत काँग्रेसचा समाचार घेतला.

ते म्हणाले, भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळी अनेक देश स्वतंत्र झाले. मात्र ते पुढे गेले आणि आपण मागे राहिलो. त्याला कारणीभूत काँग्रेसचे सरकार आहे. लाल किल्ल्यावरून काही पंतप्रधानांनी आपल्या भारतीय नागरिकांना आळशी म्हणून संबोधले. त्यांच्या विचारांचे सरकार देशाला कसे पुढे घेऊन जाणार? गांधींच्या काळातच काँग्रेस बरखास्त केले असते तर आपला देश पाच दशक पुढे असता. या काँग्रेसने देशाचे पाच दशक वाया घालवले, अशी टीका मोदींनी केली.

देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारत सहाव्या स्थानावर होता. 2014 मध्ये भाजपच्या हातात सत्ता आली त्यावेळी आपली अर्थव्यवस्था सहा वरून 11 व्या क्रमांवर होती. आता दहा वर्षांत आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. मुंबईत आता मोठी गुंतवणूक होत आहे. स्वप्न नगरी असलेल्या मुंबईत मी 2047 चं स्वप्न घेऊन आले आहे. आता मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या मुलांना विश्वास देतो की मी तुम्हाला विकसीत भारत देणार आहे, असा शब्दही पंतप्रधान मोदींनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com