NCP News
NCP Newssarkarnaka

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या कन्येवर प्राणघातक हल्ला

NCP News : नाशिक ग्रामीण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Published on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) दिवंगत नेते वसंतराव पवार यांच्या कन्या डॉ. प्राची पवार (Dr. Prachi Pawar) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन परिसरात काल (मंगळवारी) सांयकाळी ही घटना घडली. या हल्लामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात डॉ. प्राची पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. नाशिक ग्रामीण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत. डॉ. प्राची पवार या प्रख्यात नेत्ररोगतज्ज (Ophthalmologists) आहेत. डॉ. प्राची पवार आपल्या फार्म हाऊसवर कारने गोवर्धन परिसरातून जात होत्या.

NCP News
BJP : राजकारण तापलं ; चंद्रकांत पाटलांनंतर पुन्हा एका भाजप आमदारावर शाईफेक

यावेळी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावर त्यांना दुचाकी लावलेली दिसली. दुचाकी बाजूला घ्या असं त्यांनी संबधीतांना सांगितलं. परंतु याचा राग आल्याने अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्यातील एकाने चालकाच्या सीटवर बसलेल्या प्राची यांच्या हातावर दोन ते तीन ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले. हल्ला होताच डॉ.पवार यांनी तात्काळ गाडीच्या काचा लावल्या. हल्ला करुन आरोपींनी येथून पळ काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com