Sanjay Raut : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर राऊतांचा पलटवार ; म्हणाले, "तुम्ही जर सोलापुरात.."

Maharashtra Karnataka border dispute : आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या,"
Maharashtra Karnataka border dispute latest news
Maharashtra Karnataka border dispute latest newssarkarnama

Maharashtra Karnataka border dispute : जत तालुक्यातील गावाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी (Basavaraj Bommai) केलेल्या विधानामुळे सध्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. (Maharashtra-Karnataka border dispute news update)

बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभ करणार असल्याचे म्हटलं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले . राऊत नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटाचे आमदार, भाजप नेते , कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली.

Maharashtra Karnataka border dispute latest news
Udayanraje Bhosale : पुढचा मोर्चा आझाद मैदानावर ; रायगडावरून उदयनराजेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

संजय राऊतांनी बसवराज बोम्मई यांना उलट प्रश्न करीत खडेबोल सुनावले आहेत. राऊत म्हणाले, "बोम्मईंनी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली आहे, त्यांना जर सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असेल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या,"

राऊत म्हणाले, "मागील काही महिन्यात ज्या पद्धतीने तपास यंत्रणांची विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायला पाहिजे. विरोधी पक्षाला अडचण आणण्यासाठी सत्ताधारी एकही वेळ सोडत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्रातील यंत्रणा कामाला लावून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे,"

"उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या अपमान केल्यानंतर जी भूमिका घेतली, त्याच्याशी मी सहमत आहे. छत्रपती शिवरायांच्या अपमानंतर त्यांनी जी काही जनजागृती केली आहे. त्यांच्यासोबत आहे," असे राऊत म्हणाले.

भाजपकडून सर्रास शिवरायांचा अपमान करण्याचे सत्र सुरु आहे. भाजप हे शिवप्रेमाचे ढोंग करत आहे. मोदी यांना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होत आहे. मग महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्यावर तुमची अस्मिता थंड का पडते, तिथे तुमचा नाग फणा काढत नाही. काही चुकीचं असेल तर मला सांगा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर आता दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. जत तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींनी काही वर्षापूर्वी केलेल्या ठरावाचा दाखला देत बोम्मई यांनी या गावांना कर्नाटक सामील करुन घेणार असल्याचे म्हटले आहे. या ठरावांचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे असं बोम्मई यांनी म्हटले आहे. मात्र राज्य सरकाराने महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com