मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये आता युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे वेगळ्या अडचणीत सापडले आहेत. आरे कारशेड विरोधात केलेल्या आंदोलनामुळे ठाकरे यांच्यावर कारवाई टांगती तलवार आहे. या आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र पाठवून ठाकरे यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Aaditya Thackeray Latest News)
आयोगाकडून सोमवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना नोटीस पाठवून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. शिंदे सरकारने आरेच्या जमिनीवरच कारशेड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.(Shivsena Latest Marathi News)
आदित्य ठाकरे यांनी रविवारी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी आंदोलनात लहान मुलांचा वापर केल्याची तक्रार सह्याद्री राईट्स फोरमचे लिगल हेड दृष्टीमान जोशी यांनी ट्विटरवरून आयोगाकडे केली होती. त्याची आयोगाने तातडीने दखल घेत घेतली आहे.
त्यानुसार आयोगाने मुंबई पोलिसांना नोटीस पाठवून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असंही आदेशात म्हटलं आहे. संबंधित मुलांना बाल कल्याण समितीमोर हजर करून त्यांचेही जबाब नोंदवावेत. त्यानंतर केलेल्या कारवाईचा अहवाल एफआयआर कॉपीसह पुढील तीन दिवसांत सादर करावा, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.