
Navi Mumbai 14 villages merger : शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय द्वंद, स्थानिक स्वराज्य निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसं वाढू लागलं आहे. आता तर एकनाथ शिंदे यांना गणेश नाईक यांच्या कट्टर राजकीय विरोधक मंदा म्हात्रे यांचा अप्रत्यक्षरित्या बळ मिळालं आहे.
विशेष म्हणजे, गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे एकाच पक्षातील, भाजपमधील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाईक-म्हात्रे यांच्यातील राजकीय वाद पक्षाला परडवणार नाही, हे ओळखून भाजप श्रेष्ठींनी लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. परंतु भाजप पक्षश्रेष्ठींची देखील यातून डोकेदुखी वाढल्याची चर्चा रंगली आहे.
नवी मुंबई ठाणे आणि कल्याणच्या वेशीवरील 14 गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचा आणि भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद रंगला आहे. आता या वादात गणेश नाईक यांच्या पक्षांतर्गत कट्टर विरोधक बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उडी घेतली आहे. मंत्री नाईक यांच्या भूमिकेला छेद देत, अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या मुद्द्यावर पाठिंबा दिला आहे. म्हात्रे यांच्या या भूमिकेमुळे भाजपचीच कोंडी झाली आहे. यावर तोडगा काढताना भाजप पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
भाजप (BJP) आमदार मंदा म्हात्रे यांनी, नवी मुंबईला जोडली जात असलेली ही 14 गावे आमचीच आहे. त्यांनीही नवी मुंबईसाठी त्याग केलेला आहे. यामुळे सरकारने ही गावे दत्तक घेऊन तिथे सुविधा दिल्याच पाहिजेत, अशी भूमिका घेत मंत्री गणेश नाईक यांच्या भूमिकेला थेट छेद दिला.
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनी या 14 गावांचा भुर्दंड कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही. निवडणुकीनंतर ही गावे वगळणार असून, त्यासाठी कोणत्याही पातळीवर संघर्ष झाला, तरी चालेल. ही गावे ठाण्याला जोडावी. ही गावे जोडल्यामुळे नवी मुंबईच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरीक्त ताण पडणार आहे, असे म्हटले होते.
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनी या 14 गावांचा भुर्दंड कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही. निवडणुकीनंतर ही गावे वगळणार असून, त्यासाठी कोणत्याही पातळीवर संघर्ष झाला, तरी चालेल. ही गावे ठाण्याला जोडावी. ही गावे जोडल्यामुळे नवी मुंबईच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरीक्त ताण पडणार आहे, असे म्हटले होते.
मंत्री गणेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी वाशी इथं कार्यक्रमात चांगलेच आक्रमक झाले होते. थेट नालायक असा उल्लेख करत, या लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, नाहीतर शहराचे वाटोळे होईल, अशी भीती व्यक्त करत मतदारांना मंत्री नाईक यांनी भावनिक आवाहन केले. महापालिका निवडणुकीत युती होवो अथवा न होवो, नवी मुंबई महापालिकेत महापौर मात्र भाजपचाच बसेल, असेही मंत्री नाईक यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.